Dhammachakra Pravartan Din 2023 : अकोल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन; प्रकाश आंबेडकर लोकसभेला करणार का सीमोल्लंघन ?

Prakash Ambedkar News : धम्मचक्र प्रवर्तन दिन मेळाव्यापूर्वी निघणाऱ्या मिरवणुकीतून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

जयेश गावंडे

Akola News: विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात पार पडणाऱ्या धम्मचक्र मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. या मेळाव्यात गेल्या ३९ वर्षांपासून अॅड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करीत राजकीय, सामाजिक, धार्मिक आदी विषयांवर आपली भूमिका मांडत असतात.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन मेळाव्यापूर्वी निघणाऱ्या मिरवणुकीतून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

अकोला लोकसभेच्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर भीमसागराने मिरवणुकीत त्यांचे जंगी स्वागत केले. सलग अकराव्यांदा अॅड. आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्याने वंचित बहुजन आघाडीमध्ये उत्साह संचारल्याचे मिरवणुकीतून जाणवले.

यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला भव्यदिव्य स्वरूप देण्यात आले. अकोला शहरातील ज्या मार्गांवरून मिरवणूक जाते, त्या सर्व मार्गांवर मोठे प्रचार फलक व फ्लेक्स उभारण्यात आले होते. शहरातील गांधी चौकात ‘आय लव्ह आंबेडकर’ या एलईडी लाईट्सच्या ‘सेल्फी पॉइंट’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Prakash Ambedkar
Ajit Pawar on Shinde - Fadnavis Delhi Tour : शिंदे-फडणवीसांची एकत्र दिल्लीवारी; पण अजितदादांना थांगपत्ताच नाही !

शहरात निघालेल्या मिरवणुकीत ठिकठिकाणी ॲड. प्रकाश आंबेडकरांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. ॲड. आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. सुजात आंबेडकर प्रथमच वडिलांच्या खांद्याला खांदा लावत राजकीय आखाड्यात उतरल्याने पश्चिम विदर्भातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीत सुजात आंबेडकर असतील की नाही, याबद्दल अस्पष्टता होती. परंतु ते मिरवणुकीत सहभागी असल्याची बाब कळल्यानंतर अकोल्यातील कानाकोपऱ्यातून तरुणाईचा जनसागर मिरवणुकीच्या मार्गाकडे लोटला. रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी झाली.

‘जय भीम’ आणि ‘बाळासाहेब आंबेडकर आगे बढो’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भीमसागराच्या सुविधेसाठी चहा, नाश्ता व पाण्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यामुळे अख्खे अकोला शहर बुधवारी (ता २५) भीममय झाले होते. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या चिमुकल्यांना व महिलांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी भीमसैनिक अविरतपणे कार्यरत होते.

मिरवणुकीचा दिवस असल्याने बुधवारी सकाळी सातपासूनच अकोला शहरात जय्यत तयारी सुरू झाली होती. दरवर्षी नागपूरनंतर अकोल्यात होणारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाची ही सभा अत्यंत महत्त्वाची असते. नागपूर येथील दीभाभूमीवरून परतणारा जनसागर आवर्जून अकोल्यात थांबून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकत असतो.

Edited by Ganesh Thombare

Prakash Ambedkar
Ajit Pawar News: अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रम घेणं झालं कठीण; नेमकं कारण काय ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com