Gondia : बारामतीत भूसुरुंग स्फोट; आत्रामांचे भाकीत

Change in Party : चाव्याच नाही तर अख्खी ‘घड्याळ’च गायब होणार असल्याचा दावा
NCP Maharashtra
NCP MaharashtraGoogle
Published on
Updated on

Dharmarao Baba Aatram : नक्षलग्रस्त गडचिरोलीची पाळंमुळं ठाऊक असल्यानं धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी स्फोट, चकमक हे नेहमीचंच. त्यातच बाबांनी गोंदियातून अशी एक वात पेटलीय असं स्पष्ट केलं की, त्या भूसुरुंगाचा मोठा स्फोट थेट बारामतीत होणार आहे. या स्फोटामुळं घड्याळीचे उरलेसुरले काटेच नाही तर अख्खी ‘घड्याळ’च गायब होणार असल्याचा दावा त्यांनी केला. अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होणार, असा ठाम दावा करणाऱ्या बाबांनी लवकरच होणाऱ्या या स्फोटाचा इशारा दिल्यानं बारामतीकर काकांच्या गटात आणखीनच अस्वस्थता पसरली.

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या निमित्तानं बाबा शनिवारी (ता. २८) गोंदियात आले होते. त्यावेळी धर्मरावबाबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच सत्तेत सहभागी होण्यासाठी ‘वेटिंगचं तिकीट’ घेऊन रांगेत उभे असल्याचा ठाम दावा केला. पाटील यांची ‘सिट कन्फर्म’ होताच त्यांच्या पाठोपाठ नाही अख्खा पवार गटाचा तंबू रिकामा झाला, तर सांगा, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. (Dharmarao Baba Atram claims that the entire Sharad Pawar group of NCP will be emptied including Jayant Patil)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी आहोत. राज्याच्या सत्तेत आम्ही सहभागी झालो आहोत. ५३ पैकी ४५ आमदार आमच्यासोबत आहेत. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजितदादांसोबत दिसतील. त्यावेळी कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. यापूर्वीदेखील आपण असे सांगितले होते. पुन्हा एकदा तेच ठामपणे सांगतोय, असं आत्राम म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात सध्या ‘पावर प्ले’ सुरू आहे. त्यामुळे राज्यात सगळीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत. लवकरच यातील ‘काका’ गट पूर्णपणे गायब होईल, असं आत्राम यांनी सांगितलं. अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते होणारच आहे, असा दावाही आत्राम यांनी केला. हे सगळं कसं घडेल हे संपूर्ण महाराष्ट्र बघेल, असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जसा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला अगदी तसाच धक्का अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाय. पक्षामध्ये पडलेली ही फूट सावरता सावरता तिकडे उद्धव ठाकरे व ईकडे शरद पवार यांची चांगलीच कसोटी लागत आहे. या फोडाफोडीमुळं मात्र सध्या महाराष्ट्रातील या दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना हे चाललंय तरी काय आणि आपण करायचं काय हे सुचेनासं झालंय.

(Edited By : Prasannaa Jakate)

NCP Maharashtra
Gondia Dharmarao Baba News : गाळेधारक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन; पालकमंत्री धर्मरावबाबा कशी घालणार सांगड?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com