Dharmaraobaba Atram : काँग्रेसचे ‘हे’ ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार, ‘बाबां’चा गौप्यस्फोट !

Praful Patel : प्रफुल पटेल भंडारा-गोंदियातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
Dharmaraobaba Atram
Dharmaraobaba AtramSarkarnama

Dharmaraobaba Atram : सद्यःस्थितीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील काही नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत, असे राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. नागपुरातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिस अहमद आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट धर्मरावबाबांनी केला.

धर्मरावबाबा आज (ता. 10) सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भासाठी दोन जागा आम्ही महायुतीतून मागितल्या आहेत. भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या दोन जागांवर आमचे उमेदवार लढणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल हे भंडारा-गोंदियातून तर मी स्वतः गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. याशिवाय राज्यातून 9 लोकसभेच्या जागा आम्ही मागितल्या आहेत. असे असले तरी महायुतीमधील प्रमुख नेते काय निर्णय घेतात, यावर सर्व अवबंलून आहे.

Dharmaraobaba Atram
Atram VS Pawar : मीडियाला सांगतात की, भीत नाही; मग नोटीसला उत्तर का देत नाहीत?

भंडारा-गोंदिया हा प्रफुल पटेल यांचा बालेकिल्ला आहे. ही जागा आम्हाला मिळाल्यास येथे निश्‍चितच आमचा विजय होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या निवडणुकीत तेथे भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी यावेळी आमची मागणी कायम आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यभर चर्चेत आहे. याबद्दल विचारले असता, बारामतीमध्ये आमचा उमेदवार एक लाखाच्या वर मताधिक्याने निवडून येईल, असे धर्मरावबाबा म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (अजित पवार) राज्यसभेवर निवडून जातील, अशी चर्चा राज्यात सुरू आहे. यावर राज्यसभेवर कोण जाईल, हे सांगता येणार नाही. पण कॉंग्रेसमधील एक कर्तृत्ववान नेतृत्व आमच्याकडे येत आहे. यामुळे आमचा पक्ष अधिक मजबूत होणार आहे. कॉंग्रेसमध्ये त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना वाव नसल्यामुळे ते आमच्याकडे येत आहेत. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे चांगले वजन आहे आणि एक मुस्लीम चेहरा म्हणून पक्षवाढीसाठी ते महत्वाचे ठरणार आहेत, असे ते म्हणाले.

नागपूरचे मोठे-मोठे लोक आमच्या पक्षात आणि भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. निवडणूक जवळ येताच कॉंग्रेसचे तुकडे तुकडे होत आहेत. इंडिया आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर कॉंग्रेसचे बरेच नेते संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये मोठमोठे प्रवेश झालेले बघायला मिळतील, असाही दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com