Dharmaraobaba On Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणारच, ‘बाबां’ना आहे पूर्ण खात्री !

Ajit Pawar : अजित पवार पुढील काळात महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
Dharmaraobaba Atram and Ajit Pawar
Dharmaraobaba Atram and Ajit Pawar
Published on
Updated on

Nagpur Political News : कोण होणार मुख्यमंत्री, हा विषय महाराष्ट्रभर गाजत आहे. त्यासाठी फलकबाजीही केली जात आहे. नेत्यांकडून दावे, प्रतिदावे केले जात आहेत. अशात गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात ‘बाबा’ म्हणून ओळखले जाणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची खात्री आहे. (Ajit Pawar is going to visit Maharashtra next time)

आज (ता. २९) नागपुरात पत्रकारांशी बोलताना धर्मरावबाबा म्हणाले, ‘मी पुन्हा येईन...’ हे भारतीय जनता पक्षाने केलेलं ट्विट त्यांनी नंतर डिलीट केलं आहे. त्यामुळे त्यावर आता बोलण्यात काही अर्थ नाही, पण अजितदादा मुख्यमंत्री होतील, याची मला खात्री आहे. अजित पवार पुढील काळात महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. २०२४च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ९० जागा मागण्यांचे आमचे ठरले आहे. पुढे ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि निर्णय काय होतो, हे बघावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमचं सरकार चांगलं सुरू आहे. सध्या यात काहीही बदल होणार नाही. मात्र, पुढील मुख्यमंत्री अजितदादा व्हावे, अशी आमचा भूमिका आहे, असे मंत्री आत्राम म्हणाले.

महाराष्ट्र भ्रमणावर निघाल्यानंतर विदर्भातली अजित पवारांचा दौरा होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. विदर्भात पक्ष वाढेल, याचा विश्‍वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते बसून ठरवतील की, मुख्यमंत्री कोण होणार. तडफदारीने काम करणारा नेता म्हणून अजित पवारांकडे बघितले जाते. त्यांच्याकडे मोठा अनुभव असल्याने दादांना मुख्यमंत्री करावं, असं माझं मत आहे.

भेसळ करणाऱ्यांची खैर नाही...

दिवाळी सणाच्या पर्वावर खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. ‘नेमेची येतो पावसाळा...’ या उक्तीप्रमाणे या भेसळीचे झाले आहे. दरवर्षी कारवाईचा बडगा उगारला जातो. तरीही भेसळ होतेच. यावर्षी अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून आपण काय उपाययोजना करणार, हे विचारले असता. पाच-सहा दिवसांपूर्वी हल्दीरामवर मोठी कारवाई केली आहे. व्यापारी लहान आसो की मोठे, भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पुढील चार-पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याचे आपल्याला दिसेलच, असे मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Dharmaraobaba Atram and Ajit Pawar
मंत्री धर्मरावबाबा आत्रामांनी सांगितली योजना | Dharmaraobaba Atram | Ajit Pawar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com