Financial Fraud Complaint : फडणवीसांचा आणखी एक मंत्री अडचणीत, सरकारला दोन कोटींना गंडवले? माजी आमदाराची थेट पोलिसांमध्ये तक्रार

Former MLA Anil Gote BJP Minister Jayakumar Rawal Dhule government financial fraud : धुळे जिल्ह्यातील भाजप मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात सरकारची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
Jayakumar Rawal
Jayakumar Rawal Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याचा भाजप मंत्री जयकुमार रावल अडचणीत येण्याची शक्यता आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्याविषयी सरकारची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

दोंडाई पोलिस ठाण्यात ही तक्रार केली आहे. सरकारच्या तिजोरीतून 2 कोटी 65 लाख रुपये हडपल्याची ही तक्रार आहे. अनिल गोटे यांच्या या तक्रारीवरून मंत्री रावल यांच्याबरोबर फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मंत्री रावल यांच्याविरोधातील तक्रारीमुळे विरोधकांना पुन्हा एकदा फडणवीस सरकारला घेरण्याची संधी मिळणार आहे.

महायुती (Mahayuti) सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक भलतेच आक्रमक झालेले दिसले. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम हे मंत्री चांगलेच अडचणीत आले होते. धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढचा नंबर कोणाचा, यावरून विरोधक फडणवीस सरकारला इशारा देत असतानाच, त्यात मंत्री जयकुमार रावल यांच्या तक्रारीची भर पडली आहे.

Jayakumar Rawal
Jitendra Awhad on Mahayuti government : जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वाद चिघळणार; औरंगजेबाच्या कबरीवरून नेमकं काय म्हणाले?

जयकुमार रावल सध्या फडणवीस सरकारमध्ये पणन मंत्री आहेत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये जमीन गेल्याचा बनाव जयकुमार रावल यांनी केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. जमीन धरणात जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र (Maharashtra) सरकारलाच मंत्री जयकुमार रावल यांना फसवले असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.

Jayakumar Rawal
Supriya Sule: ‘बरं झालं पक्ष फुटला, राष्ट्रवादीच्या फुटीवर सुप्रियाताईं म्हणाल्या, 'अशा फालतू माणसाबरोबर...'

माजी आमदार अनिल गोटे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीची शेत जमीन शेवाळे धरणात जाणार असल्याचे भासवले. तशी कागदपत्रे तयार करत सरकारची तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले. आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतल्याचे म्हटले आहे.

जयकुमार रावल यांनी आमदारकीच्या दबावातून अधिकाऱ्यांवर दबाव आणत, सदर जमिनीचे तीन वेळा जाॅईंट सर्व्हे करण्यास भाग पाडले. जयकुमार रावल यांनी यासाठी आपल्या राजकीय वजनाचा पुरेपूर वापर केला, असे सांगून दोंडाईचा पोलिस ठाण्यामध्ये या फसवेगिरीविरोधात तक्रार दाखल केल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. माजी आमदार अनिल गोटे यांनी थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने मंत्री रावल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मंत्री रावल यावर काय भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com