Uddhav Thackeray News : शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटातील काही मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी आज यावर शंका व्यक्त करत शिंदे गटातील मंत्र्यांचे प्रकरण बाहेर काढण्यात भाजपचाच तर हात नाही ना? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे चर्चेला उधान आलं आहे.
''शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरमध्ये अनेक मुद्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ''ज्या प्रकारे शिंदे गटातील मंत्र्यांचे प्रकरणं बाहेर येत आहेत. यांना भाजप तर टाचणी लावत नाही ना? कारण बरोबर त्याच मंत्र्यांची प्रकरणं बाहेर कशी येत आहेत? पण हा विचार त्यांनी केला पाहिजे'', अशी शंका त्यांनी उपस्थित केली. ''निवडणुकीला अजून वेळ आहे असं आपण मानतो. पण माझ्या मते येत्या वर्षभरात निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी त्या पद्धतीची तयारी करा'', असं अवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं.
''जे गद्दार होते ते गेले, जे कट्टर शिवसैनिक होते ते राहिले. ढिगभर गद्दार असण्यापेक्षा मुटभर आपली माणंस कधीही चांगली. मुखवटाधारी माणसं निघून गेलेली कधीही चांगली. आपल्याकडे राहून तिकडचे वेध लागत असतील तर एकदा जा. शिवसेनेला दगाफटका हा नवीन नाही. जो पर्यंत झाडं आणि झाडाची मुळं घट्ट आहेत तो पर्यंत मला भिती नाही'', असं म्हणत ठाकरेंनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर प्रहार केला.
''खरं तर शिवसनेत विकली गेलेली मानसं मी का ठेवू? हे घडणार याची कल्पना होती, झाडाची सडलेली पानं झडलीच पाहीजेत तरच नवीन पानं येतात'', असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर घणाघात केला. ''संजय राऊत (Sanjay Raut) तुरुंगात होते, त्यांना देखील आमिष दाखवण्यात आले. मात्र ते गेले नाहीत. त्यांनी ठरवलं असतं तर ते देखील त्यांच्या सारखं करू शकले असते. पण ते कट्टर शिवसैनिक आहेत ते माझ्या सोबत आहेत. कारण माझ्या झाडाची मूळं आता सोबत आहेत, असं म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.