Bhandara DPC : 205 कोटींच्या योजनेला मंजुरी, तरीही जिल्हा परिषद सदस्य नाराज

Zilla Parishad : खासदार-आमदारांच्या मक्तेदारीने नियोजन समिती सभेत दिसली उदासीनता
DPC Meeting in Bhandara.
DPC Meeting in Bhandara.Sarkarnama
Published on
Updated on

Development Committee : राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हा परिषद सदस्य नाराज झाले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण 205 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आलीय. 155 कोटींच्या अंतिम मंजूर निधीची तरतूद करण्यात आलीय

पालकमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर निधीचे वितरण केले असले तरी नियोजन मंडळाची ही बैठक पुन्हा एकदा चर्चेत आलीय. बैठकीत आमदारांनी आपलीच मागणी पुढे करीत हेकेखोरी केली. या मक्तेदारीमुळे समितीमधील जिल्हा परिषद सदस्य हिरमुसले आहेत. आपल्या मागण्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आल्याची भावना जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त करीत सभात्याग केला.

DPC Meeting in Bhandara.
Bhandara : पालकमंत्र्यांची बैठक सुरू असताना ‘ख़ुदा न ख़्वास्ता’ आग लागली तर...

‘सरकारनामा’शी बोलताना जिल्हा परिषद गटनेते तथा भाजपचे भंडारा तालुकाध्यक्ष विनोद बांते आणि जिल्हा परिषद सदस्य (भाजप) प्रियंका बोरकर यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली. बांते म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य हे ग्रामस्तरावर कामे करीत असतात. त्यांना जी माहिती असते, ती खासदार-आमदार आणि मंत्र्यांनाही नसते. अशा सदस्यांना बोलू दिले जात नव्हते. अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यामुळे दुर्लक्षित राहिले. शिक्षकांची कमतरता हा मुद्दा महत्त्वाचा होता. वर्गखोल्यांची दूरवस्थाही चर्चेला येणे गरजेची होती. पंचायत समितीच्या जीर्ण इमारतींचा प्रश्नही अचर्चित राहिला, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निवासस्थानाचा मुद्दाच घेण्यात आला नाही.

जलसंधारण योजनेअंर्तगत डावी कडवी योजना ही विचारात घेतली गेली नाही. झुडपी जंगलामधील 2011 आधीचे व नंतरचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतच्या जागांची माहिती नव्हती. अद्ययावत आकडेवारीसह ही माहिती गोळा करण्याची व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शासनाला सादर करण्याचे निर्देश याबाबत आहेत. हा निर्णय वनविभागाच्या अंतर्गत येत असल्याने केंद्र सरकारकडै तो पडून राहणार आहे. त्यामुळे घरकुल मंजुरीला विलंब होऊ शकतो, असेही जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या निधीबाबतची कामं खासदार-आमदारांनी बैठकीत लावून धरली. ती मंजूर करून घेतली. त्यामुळे नियोजन समितीच्या बैठकीचा काही फायदा होईल, असे दिसत नसल्याचे बांते म्हणाले. नियोजत समितीच्या या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, विशेष निमंत्रित सदस्य तथा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी आदी उपस्थित होते.

Edited by : Prasannaa Jakate

DPC Meeting in Bhandara.
Bhandara : ‘भेल’ ठरला फेल; राजकीय उदासीनतेमुळे जिल्हा उद्योगाविना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com