‘डीपीसी’च्या निवडणुकीचा बिगुल वाजला; २९ ऑगस्टला मतदान, ३० ला मतमोजणी...

अकोला (Akola) जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने (BJP) मतदानापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांचा पराभव झाला होता.
Akola ZP
Akola ZPSarkarnama
Published on
Updated on

अकोला : जिल्हा परिषद सदस्यांचा अर्धा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) वर जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांची निवडणुकीद्वारे नियुक्ती करण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टपर्यंत इच्छुक नामनिर्देशनपत्रे दाखल करू शकतील. या निवडणुकीसाठी २९ ऑगस्ट रोजी आवश्यकता असल्यास मतदान करण्यात येईल, तर ३० ऑगस्ट रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल.

अकोल्याचे (Akola) मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत (ZP) वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. सध्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह दोन सभापती पद वंचितने काबीज केली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने (BJP) मतदानापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांचा पराभव झाला होता. नंतरच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून जिल्हा परिषदेतील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडींत वंचितच्या (Vanchit) एकहाती सत्तेला मोठा झटका बसला.

सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज चुकल्याने अपक्ष सदस्य सम्राट डोंगरदिवे यांची अविरोध तर प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांची महाविकास आघाडीकडून मतदानाच्या आधारे निवड करण्यात आली. या दोन निवडणुकीच्या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवर जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये सतत खटके उडत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेतून जिल्हा नियोजन समितीवर निवडून जाणाऱ्यांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास शासनाने परवानगी दिली असून मतदार यादीसुद्धा अंतिम झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेतून निवडून द्यायच्या १४ सदस्यांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम..

- अधिसूचना प्रसिद्ध करणे - १ ऑगस्ट २०२२

- नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख व ठिकाण - १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अपर जिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी यांचे कार्यालय

- नामनिर्देशन पत्रांची छाननी करावयाचा दिनांक - १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टपर्यंत

- नामनिर्देशन पत्रांची छाननी करावयाचा दिनांक - ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजतापासून

- नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करावयाचा दिनांक - ८ ऑगस्ट रोजी सकाळ ११ वाजतापासून

- नामनिर्देशन पत्रे फेटाळले गेल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करायचा कालावधी - १० ऑगस्ट रोजी

- जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिलावरील अंतिम निर्णयाचा कालावधी - १२ ऑगस्टपर्यंत

- अपिलानंतर वैध नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक - १७ ऑगस्ट

- उमेदवारी मागे घण्याची तारीख - १८ ऑगस्टचे दुपारी ३ वाजेपर्यंत

- निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी - १९ ऑगस्ट

- मतदानाची तारीख - २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

- मतमोजणीचा दिनांक - ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजतापासून

- मतमोजणीचा निकाल घोषित करणे - मतमोजणी झाल्यानंतर लगेच

अशी होणार सदस्यांची निवड..

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ग्रामीण भागातील विकासाचे मुद्दे व समस्या मांडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांची निवडणुकीद्वारे निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये सात महिला सदस्य व सात सर्वसाधारण सदस्यांचा समावेश असणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासह सर्वसाधारण प्रवर्गातून जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com