Dr. Ashish Deshmukh News : डॉ. आशिष देशमुख वेगळी वाट निवडताहेत, पण असणार 'ही' आव्हाने !

Sunil Kedar : सुनील केदार यांच्या बालेकिल्ल्यात हा सोहळा सध्या सुरू आहे.
Ashish Deshmukh and Sunil Kedar
Ashish Deshmukh and Sunil KedarSarkarnama

Dr. Ashish Deshmukh in Sunil Kedar Constituency : कॉंग्रेसमधून काढल्यानंतर माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी वेगळी वाट निवडली आहे. याचाच एक भाग म्हणून माजी मंत्री रणजीत देशमुख यांच्या सावनेरातील अभीष्टचिंतन सोहळ्याकडे बघितले जात आहे. कॉंग्रेसचे हेवीवेट नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या बालेकिल्ल्यात हा सोहळा सध्या सुरू आहे. (This ceremony is currently going on in the fort of Sunil Kedar)

माजी मंत्री रणजीत देशमुख यांचा अभीष्टचिंतन सोहळा सावनेर विधानसभा मतदारसंघातील हेटी सुर्ला येथे साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याकडे राजकीय नेत्यांचेही लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. देशमुख यांच्या घरी जाऊन आले.

राजकीय वर्तुळात या सर्व घडामोडी बघून डॉ. देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. सावनेरात माजी मंत्री केदारांना तुल्यबळ लढत देणारा नेता भाजपकडे आतापर्यंत कुणीही तयार झाला नाही. डॉ. आशिष देशमुखांकडे भाजप येथील योद्धा म्हणून तर बघत नाहीये ना, असा प्रश्‍न राजकीय चर्चिला जात आहे.

डॉ. देशमुखांवर भाजपची नजर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे डॉ. देशमुख यांच्यापुढे सावनेरात समर्थक गोळा करावे लागणार आहे. या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केदार यांच्या बालेकिल्ल्यात स्वतःचे समर्थक गोळा करणे किंवा त्यात वाढ करण्याचे मोठे आव्हान डॉ. देशमुख यांच्यापुढे राहणार आहे. यात ते किती यशस्वी ठरतात, यावरून त्यांचा भाजपकडे जाणारा मार्ग सुकर किंवा कठीण होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Ashish Deshmukh and Sunil Kedar
Nana Patole यांनी एका वाक्यात विषयच संपवला |Congress|Maharashtra Congress State President|Sarkarnama

२०१४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बलाढ्य नेते काका अनिल देशमुख यांना पराभूत करून डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) काटोलचे आमदार बनले होते. पण विदर्भाच्या मुद्द्यावरून त्यांचे भाजप नेत्यांशी जुळले नाही आणि त्यांनी राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०१९मध्ये ते नागपूर दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टक्कर दिली. केवळ ११ दिवस प्रचारासाठी मिळालेले असतानाही त्यांनी जोरदार टक्कर दिली.

पण नंतर नंतर कॉंग्रेसमध्येही (Congress) त्यांचे मन रमले नाही आणि कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी पंगे घेणे सुरू केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर आगपाखड करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाही सल्ले देणे त्यांनी सुरू केले. परिणामस्वरूप त्यांना कॉंग्रेसमधून काढण्यात आले. त्यानंतर आता ते पुन्हा भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा आहे. पण सावनेरात जाऊन केदारांना टक्कर देऊन निवडून येणे, तेवढेही सोपे नाही. या लढाईत त्यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com