Dr. Ashish Deshmukh : ‘मी त्याच्याकडं पाहिलं, तर तो तिकडं पाहात होता’, प्रवेशाच्या कार्यक्रमातही पटोलेंना लगावले टोले !

Nagpur : घरी परत येण्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.
Chandrashekhar Bawankule, Ashish Deshmukh and Devendra Fadanvis.
Chandrashekhar Bawankule, Ashish Deshmukh and Devendra Fadanvis.Sarkarnama
Published on
Updated on

I have a good experience with Congress presidents :सुबह का भुला शाम को घर वापस आ जाये, तो उसे भुला नही कहते, असे म्हणत डॉ. आशिष देशमुख यांनी भाजप प्रवेश कार्यक्रमात भाषणाची सुरुवात केली.

आजवर झालेल्या सर्व चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेमध्ये हा प्रवेश होत असल्याने घरी परत येण्याचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले. (The joy of returning home is doubled)

आज (ता. १८) नागपूरनजीकच्या कोराडी येथे कॉंग्रेसमधून निष्कासीत करण्यात आलेले माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे नागपूर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, अशोक मानकर, रमेश मानकर, राजीव पोतदार, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, दिनेश ठाकरे, प्रकाश टेकाडे आदी होते.

बावनकुळेंमुळे मोठ्या संख्येने भाजप प्रवेश..

स्वगृही परत येताना स्वागताची जी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली. त्याचे कौतुक केले पाहिजे. कारण त्यांनी त्यांच्या गावात म्हणजे कोराडीत मॉ जगदंबेच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम घेतला, ही मोठी गोष्ट आहे.

बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बाहेरचे लोक मोठ्या संख्येने भाजपमध्ये येत आहेत आणि स्थिरावत आहेत. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा मला चांगला अनुभव आहे. ‘आपण त्याच्याकडं पाहिलं की तो तिकडं पाहाते’, असे खास शैलीत नाना पटोलेंचे नाव न घेता आशिष देशमुख यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसारखा तोरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यामध्ये नाही. ते जनसामान्यांमध्ये मिसळणारे आहेत. त्यामुळे माझ्यासारखे अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत, अशा शब्दांत डॉ. देशमुख यांनी बावनकुळेंचे कौतुक केले.

Chandrashekhar Bawankule, Ashish Deshmukh and Devendra Fadanvis.
Chandrashekhar Bawankule यांचा मोठा गौप्यस्फोट, Sharad Pawar यांचा प्लॅनच सांगितला | Sarkranama

फडणवीस हे विलक्षण व्यक्तिमत्व..

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात आजवर जे कुणी विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, ते सर्व फडणवीसांचे प्रशंसक आहेत. तीन दिवसांपूर्वी पाहिलं की विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोट्या जाहिरातींबद्दल जी मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी फडणवीसांचे कौतुक केले.

खरं बोलण्याचं धाडस पवारांनी (Ajit Pawar) केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक केलं पाहिजे. त्यापूर्वीचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये महसूल मंत्री आहे. त्यापूर्वीचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत आणि फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) नेतृत्वात काम करत आहे.

Chandrashekhar Bawankule, Ashish Deshmukh and Devendra Fadanvis.
Devendra Fadanvis News : डॉ. आशिष देशमुख सामान्य माणूस नाही, तर मोठा कलाकार आहे !

मीसुद्धा २०१९ची निवडणूक त्यांच्या विरोधात लढलो होतो आणि आज मीसुद्धा त्यांच्यासोबत आलो आहे. म्हणूनच फडणवीस हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे, असे आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com