Nagpur Teachers Constituency Election : कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी कुणालाही समर्थन जाहीर केले असले, तरी त्याचा मला काही फरक पडणार नाही. कारण कॉंग्रेसचे सर्व प्रमुख नेते माझ्यासोबत आणि आणि त्यांनी मला पाठिंबा दिला आहे, असे नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे निवडणूक लढवीत असलेले सुधाकर अडबाले म्हणाले.
कोणतीही निवडणूक (Election) म्हटली की, या गोष्टी चालतच असतात आणि मोठ्या राजकीय पक्षामध्ये ही गोष्ट काही नवीन नाही. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी घेतलेल्या भूमिकेचा कुठलाही फरक पडणार नाही. कॉंग्रेसचे (Congress) काही नेते शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्याकडे तर काही नेते अडबाले यांच्यासोबत आहेत. यात विभाजनाचा फटका बसणार नाही का. असे विचारले असता, या निवडणुकीत मतदार संघटनांकडे असतात आणि शिक्षकांच्या सर्व संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे, असे अडबाले म्हणाले.
निवडणुकीपूर्वीच पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यातील शिक्षक संघटनांशी आणि संबंधित शिक्षकांशी माझा संपर्क झालेला आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेते माझा प्रचार करणार आहेत. तिन्ही पक्षांचे नेते प्रचारासाठी सक्रिय झालेले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अद्याप अडबाले यांना पाठिंबा दिल्याची घोषणा केलेली नाही. हे कुठेतरी अडचणीचे वाटत आहे. यावर बोलताना ते म्हणाले, नाना पटोले सतत आमच्या सोबत आहेत. पाठिंब्यासाठी एका पक्षाचा आता प्रश्न नाही, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा मला आहे.
काही अडचणींमुळे नाना पटोले बोलत जरी नसले तरी ते आमच्या व आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांचा पाठिंबा जाहीर झाल्यासारखाच आहे. सहाही जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी सर्व कामाला लागले आहेत. सर्वाधिक शैक्षणिक संस्थाचालक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये आहेत आणि हे सर्वजण कामाला लागल्यामुळे ही निवडणूक खूर सोपी झाली असल्याचेही सुधाकर अडबाले यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या भूमिकेपुढे डॉ. आशिष देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेचा कुठलाही फरक पडणार नाही. कारण तिन्ही पक्षांतील नेते एकीकडे आणि आशिष देशमुख एकीकडे. यामध्ये महाविकास आघाडीचेच पारडे जड राहणार आहे, असेही अडबाले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.