आमदार जोरगेवारांच्या प्रयत्नांनी जिंदल ग्रुप खासगी विमानाने चंद्रपुरात...

मधूसुदन रुंगठ्ठा आणि प्रदिप माहेश्वरी Madhusudan Rungtha and Pradeep Maheshwari हे विदर्भाच्या उद्योगासाठी करत असलेल्या कामात मी त्यांच्या सोबत राहणार असल्याचेही आमदार जोरगेवार यावेळी म्हणाले.
Jindal Group at Chandrapur
Jindal Group at ChandrapurSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : उद्योगांतून रोजगार निर्मिती करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ते जिंदल स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेडचे सीओओ डी. के. सरोगी यांच्या संपर्कात होते. अखेर ते जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या ग्रुपसह खाजगी विमानाने चंद्रपुरात आले. चंद्रपुरात उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे भविष्यात जिंदल ग्रुपच्या माध्यमातून येथे रोजगार निर्मिती होण्याच्या आशा बळावल्या आहेत.

सरोगी यांच्यासोबत जिंदल स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेडचे जी.एम.एस.एस नागी, स्टील अॅंड पॉवर लिमिटेड उपाध्यक्ष बी.ए. राजू, यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी एमइएलच्या विश्रामगृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत त्यांनी जवळपास तासभर चर्चा केली. एखाद्या मोठ्या कंपनीचा अधिकारी खाजगी विमानाने चंद्रपुरात पोहोचल्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे बोलले जात आहे. यावेळी विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंगठा, विदर्भ इकॉनॉमी डेवलमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.

एखादा उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे सर्व संसाधन चंद्रपुरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे चंद्रपुरात अपेक्षित अशी उद्योग वाढ झालेली नाही. याचा परिणाम येथील रोजगारावर झाला असून एकेकाळी रोजगार देणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनाच आता रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकावे लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलवून पुन्हा चंद्रपूर जिल्ह्याला रोजगार देणारा जिल्हा म्हणून गौरव प्राप्त करून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या करिता ते देशातील मोठ्या उद्योजकांच्या संपर्कात असून उद्योग वाढीतून चंद्रपुरात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहे.

देशात तिस-या क्रमांकाचे स्टील उत्पादक असलेले जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडने चंद्रपुरात उद्योग सुरू करावा, यासाठी आमदार जोरगेवार जिंदल स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेडचे सी.ओ.ओ.डी. के सरोगी यांच्याशी संपर्कात होते. यात त्यांना विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंगठा महत्वाचे सहकार्य लाभले. आमदार किशोर जोरगेवार यांचा सातत्याचा सुरू असलेला पाठपूरावा पाहता गेल्या आठवड्यात डी. के. सरोगी हे आपल्या ग्रुपसह खाजगी विमानाने चंद्रपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी चंद्रपुरातील फेरो अलॉय प्लाँट पाहण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यांनतर आमदार जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने सदर प्लांट दाखविला. यावेळी त्यांनी पूर्ण प्लांटचे निरिक्षण केले. त्यानंतर येथीलच विश्रामगृहात त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरातील खनिज संपत्ती व भौगोलीक स्थितीची त्यांना माहिती दिली. याप्रसंगी विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंगठा, विदर्भ इकॉनॉमी डेवलप्मेंड कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदिप माहेश्वरी, एमईएलचे नरेश शर्मा, अजय जायस्वाल, पंकज गुप्ता, ललीत कासट यांची उपस्थिती होती. या भेटीदरम्यान अनेक महत्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. यावेळी सरोगी यांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या रायगड येथील प्लांटला विदर्भातील उद्योजगांनी भेट देण्याचे निमंत्रन दिले. या भेटीमूळे भविष्यात जिंदल स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड चंद्रपुरात उद्योग सुरू करेल, अशी आशा निर्माण झाली आहे. असे झाल्यास चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.

या भेटीसाठी विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंगठ्ठा यांचेही महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. ते चंद्रपूरचे अध्यक्ष असताना त्यांनी उत्तम कार्य केले आहे. ते आता विदर्भाच्या कमिटीवर आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी ही भेट घडवून आणण्यात महत्वाची भूमीका बजावली आहे. तर विदर्भ इकॉनॉमी डेवलप्मेंड कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदिप माहेश्वरी हे विदर्भाच्या उदयोगाची इंतभ्युत माहिती असणारे व्यक्ती आहे, असे सांगत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्याबदल गौरत्गार काढले. यापूढे मधूसुदन रुंगठ्ठा आणि प्रदिप माहेश्वरी हे विदर्भाच्या उद्योगासाठी करत असलेल्या कामात मी त्यांच्या सोबत राहणार असल्याचेही आमदार जोरगेवार यावेळी म्हणाले.

Jindal Group at Chandrapur
...तर वेकोलिचे कोळसा उत्पादन बंद पाडू : आमदार किशोर जोरगेवार

जिंदलचे देशासह विदेशातही प्लांट

जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड ही नवी दिल्ली भारत येथे स्थित एक भारतीय स्टील आणि ऊर्जा कंपनी असून कंपनीची अंदाजे 40 हजार कोंटीची उलाढाल आहे. जिंदल गट वैविध्यपूर्ण अश्या रासायनिक, पोलाद, वीज, खाण, तेल, वायू आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर आहे. कंपनी स्वतःच्या कोळसा आणि लोहखनिज खाणींच्या माध्यमातून स्टील आणि वीज निर्मिती करते. सदर कंपनीचे प्लांट देशासह दक्षिण ऑफ्रिका, मॉरेशियस, बोलीविया, ऑस्ट्रिलीया, मोझांबिक या देशांत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com