Nana Patole : काँग्रेसला घाईच घाई पुढचा मुख्यमंत्री ठरला; नाना पटोले CM?

Congress is the largest party in Maharashtra in the Lok Sabha elections: लोकसभा निवडणूक काय अगदी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतही उमेदवार शोधण्याची पाळी आलेल्या काँग्रेसला 'अच्छे दिन' आले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nana Patole, 5 June : लोकसभा निवडणूक काय अगदी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतही उमेदवार शोधण्याची पाळी आलेल्या काँग्रेसला 'अच्छे दिन' आले. मागील निवडणुकीत एकच खासदार असलेल्या काँग्रेसचे झटक्यात 13 खासदार जिकंले. विशेष म्हणजे, सत्ताधीश असलेल्या भाजपपेक्षा 4 जागा अधिक असल्याने या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसच मोठा भाऊ ठरला आहे.

एवढे खासदार निवडून आल्याने काँग्रेसला प्रचंड बळ आले आणि पक्ष नेतृत्वाने थेट विधानसभेच्या निवडणुकीची तयारी चालवली आहे. त्यापलीकडे जाऊन काँग्रेस विधानसभेला सर्वाधिक जागा जिंकेल, आमचाच मुख्यमंत्री होईल, असे आडाखे बांधले जात आहेत. त्यातही काँग्रेससाठी जबरदस्त कामगिरी करणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भविष्यातील 'सीएम' असल्याचे चर्चा आतापासून पसरत आहे. तशी बॅनरबाजी करून पटोलेसमर्थक हवा करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला दणदणीत पुनरागमन करून देणाऱ्या नानांना आता मुख्यमंत्रीपदाचे वेध लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण पटोले यांच्या घरासमोर भावी मुख्यंमंत्री असा उल्लेख केलेले मोठे पोस्टर त्यांच्या समर्थकांनी झळकावले आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची तयारी करावी लागते. मात्र, अमूक एवढे आमदार येतीलच असे गृहीत धरुन मुख्यमंत्री ही ठरवावा ही घाईच असू शकते. पण काँग्रेस नेत्यांच्या उतावीळ कार्यकर्त्यांना आता हे कोण सांगणार?

खरंतर नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आली तेव्हा राज्यात काँग्रेसचा केवळ एक खासदार होता. आता ही संख्या तेरा झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेस क्रमांक एकवर आहे. विदर्भात एकूण सात मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) उमेदवार होते. यापैकी नागपूर आणि अकोला मतदारसंघाचा अपवाद वगळता पाच खासदार काँग्रेसचे निवडूण आले आहेत.

Nana Patole
Satej Patil Vs Amal Mahadik : पाटलांच्या होमपिचवर महाडिकांनी 'टेन्शन' वाढवलं; कोल्हापूर दक्षिण भाजपला पोषक

अकोला येथे पटोले यांनी अभय पाटलांना सारखा दमदार उमेदवार दिला होता. पटोले यांना अकोल्यातून विजयाठी आशा होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने त्यांचे समीकरण चुकवले. उमेदवार निवडणतानासुद्धा नाना पटोले यांची भूमिका निर्णायक होते. अनेकांचा विरोध पत्करून त्यांनी काही धाडसी निर्णय घेतले.

भंडारा आणि गडचिरोलीत येथे फ्रेश चेहरे दिले. भंडाऱ्याचे प्रशांत पडोळे यांच्यासमोर भाजपचे मावळते खासदार सुनील मेंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांचे तगडे आव्हान होते. पडोळेसाठी त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठापणाला लावली होती. त्यांचे निर्णय अचूक ठरले. विदर्भातील सर्व 10 जागा जिंकणार असल्याचा दावा त्यांचा होता. ते होऊ शकले नाही तरी राज्यभरात 13 खासदार निवडूण आल्याने पक्षात आणि दिल्लीत पटोले यांचे वजन चांगलेच वाढले आहे. पक्षांतर्गत विरोधकांनाही त्यांनी तोडीसतोड उत्तर दिले आहे.

नाना पटोले यांची मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. त्यासाठी त्यांनी खासदारकी सोडली. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदावर पाणी फेरले. त्याऐवजी पक्षाची अवघड जबाबदारी खाद्यांवर घेतली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यासारखे दिग्गज नेते स्पर्धेत होते. महाविकास आघाडीच्या विस्तारात मंत्रिमंडळातही पटोले यांना स्थान देण्यात आले नव्हते.

दरम्यान त्यांच्या विरोधात एक लॉबी सक्रीय झाली होती. त्यांना हटवण्यासाठी अनेकांनी खटाटोप केला. तक्रारी केल्या. मात्र लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत यशाने त्यांच्या विरोधकांची तोंडे आता बंद झाली आहेत. शिवाय नानांचे आता पुढचे मिशन विधानसभा आणि मुख्यमंत्री व्हायचे असल्याचं सांगितलं जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com