‘डीपीसी’च्या निवडणुकीत ओबीसींना डच्चू; चार जागा राहणार रिक्त !

अध्यक्ष, उपाध्यक्षासह दोन सभापती पद वंचितने काबीज केली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने (BJP) मतदानापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केले होते.
Akola ZP BJP
Akola ZP BJPSarkarnama

सुगत खाडे

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) १४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा सुरु झाली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय बैठका, चर्चा रंगत असल्या तरी डीपीसीच्या निवडणुकीत ओबीसींना मात्र डच्चू बसणार आहे. जिल्हा परिषदेत ओबीसी राखीव मतदारसंघातून एकही उमेदवार निवडून न गेल्याने या निवडणुकीत ओबीसींच्या चार जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे इच्छुक ओबीसी उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत (ZP) वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) सत्ता आहे. सध्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह दोन सभापती पद वंचितने काबीज केली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने (BJP) मतदानापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीपूर्वी इतर विरोधी पक्षांचा पराभव झाला होता. नंतरच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून जिल्हा परिषदेतील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीत वंचितच्या एकहाती सत्तेला मोठा फटका बसला. सभापतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज चुकल्याने अपक्ष सदस्य सम्राट डोंगरदिवे यांची अविरोध तर प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांची महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मतदानाच्या आधारे निवड करण्यात आली.

आता जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधकांमध्ये डीपीसीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रस्सीखेच सुरू आहे. त्यातच डीपीसीच्या १४ जागांपैकी चार जागा २० जुलै २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण जाहीर केल्याने ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात ओबीसी राखीव प्रवर्गातून जिल्हा परिषदेवर एकही उमेदवार निवडणूक न गेल्याने ओबीसींच्या चारही जागा रिक्त राहणार आहेत, तर इतर १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. परंतु सदर निवडणूक अविरोध करण्यासाठी पडद्यामागे वेगवान घडामोडी घडत आहेत.

Akola ZP BJP
प्रशासकीय अधिकारी महाबीजसाठी अनुत्सुक का? अकोला `एमडी`ची पुन्हा बदली !

उमेदवारी अर्ज ठरणार अवैध..

जिल्हा परिषदेत ५३ सदस्यांपैकी एकही सदस्य नागरिकांचा मागास प्रवर्गातून (नामाप्र) निवडून आला नाही. त्यामुळे एखाद्या सदस्याने ओबीसी प्रवर्गातील जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर तो अवैध ठरविण्यात येईल. जिल्हा परिषदेतून जिल्हा नियोजन समितीवर १४ सदस्यांची निवडणुकीद्वारे निवड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सदर निवडणुकीत ५३ सदस्यांपैकी एकही सदस्य ओबीसींसाठी आरक्षित प्रवर्गातून निवडून न गेल्याने ओबीसींच्या चार जागा रिक्त राहणार आहेत, तर प्रत्यक्षात दहा जागांसाठी निवडणूक घेण्यात येईल.

- डॉ. मुकेश चव्हाण

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अकोला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com