सुमार द्वादशीवारांनी साहित्य क्षेत्र नासविले; भाजपचे प्रदेश सचिव ॲड. मेश्राम यांची टीका !

अशा प्रसिद्धीच्या हावरटपणापायी त्यांनी आपले अज्ञान उघड केले आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम (Ad. Dharmpal Meshram) यांनी केली आहे.
Ad. Dharmpal Meshram
Ad. Dharmpal MeshramSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळविण्याआधी आपल्या नावाची चर्चा साहित्य वर्तुळात व्हावी, यासाठी हीन दर्जाची वक्तव्ये करणे व वाद निर्माण करून स्वस्त प्रसिद्धी मिळविणे, हाच सुरेश द्वादशीवार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रसिद्धीच्या हावरटपणापायी त्यांनी आपले अज्ञान उघड केले आहे, अशी बोचरी टीका भाजपचे (BJP) प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम (Ad. Dharmpal Meshram) यांनी केली आहे.

ललित साहित्याचे बहुसंख्य लेखक उच्चवर्णीय होते व त्यामुळे त्यांच्यावर सावरकर (Sawarkar) विचारांचा पगडा होता, म्हणून ते गांधीविरोधी होते असा जावईशोध लावून साहित्य क्षेत्रात नवा वर्णद्वेष द्वादशीवार निर्माण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शाळेत सरस्वतीपूजन नको म्हणणारे भुजबळ (Chagan Bhujbal) आणि सावरकर यांच्या द्वेषापोटी साहित्य क्षेत्रात प्रदूषण करणारे सुरेश द्वादशीवार यांची वैचारिक जातकुळी एकच आहे, असेही ते म्हणाले. या हीन विचारसरणीतून त्यांनी गांधी व सावरकर या महामानवांचा अपमान तर केला आहेच, पण साहित्य क्षेत्रातील हिडीस मनोवृत्तीचे प्रदर्शनही घडविले आहे.

संमेलनाध्यक्षपदावर अशा सडक्या मानसिकतेच्या सुमार लेखकास स्थान द्यावे का, याचा संमेलनाचे मतदार नक्कीच गंभीरपणे विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वादामुळे द्वादशीवारांचे साहित्य क्षेत्रात योगदान किती याचे मोजमापही करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. सावरकरांवर टीका करण्याच्या अतिउत्साहात या सुमार लेखकाने न्यायालयांचाही अपमान केला असून त्याबद्दल द्वादशीवारांनी बिनशर्त दिलगिरी व्यक्त करून आपली विधाने मागे घ्यावी तसेच संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारीतून माघार घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Ad. Dharmpal Meshram
Sharad Pawar : भाजप घेरतंय पुणे, तर शरद पवार नागपुरातून पेटवताहेत ‘संघर्षाच्या मशाली’ !

यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी पत्रक काढून द्वादशीवारांचा निषेध केला आहे. नागपूरमध्ये बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात द्वादशीवार यांनी हे विधान केल्याचे पाठक यांनी पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेसह राज्यातील बहुतांश साहित्य संस्थांनी वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी द्वादशीवार यांना पसंती दर्शविली आहे. आजच त्यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत द्वादशीवार यांचा निषेध करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com