Yashomati Thakur Alligations : 'लाव न बे ईडी हिंमत असेल तर लाव ईडी ; यशोमती ठाकूरांचे खुले आव्हान

Congress News : शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
Yashomati Thakur, Congress
Yashomati Thakur, CongressSarkarnama
Published on
Updated on

Amaravati Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि नेते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. सत्ताधारी भाजप ईडीची, सीबीआयची चौकशी लावून दबाव टाकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही भाजपवर गंभीर आरोप करत भाजपला खुले आव्हानच दिले आहे.

अमरावतीत आयोजित एका सभेत बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. "लाव न बे ईडी हिंमत असेल तर लाव ईडी. मायभिन तुले बिलकुल लाव ईडी.बघतो काय निघते तर", असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी माझ्यावर ईडी लावण्यासाठी निवेदन देण्यात आल्याचा असा गौप्यस्फोट केला. तुम्ही ईडी लावाच मीपण बघते काय निघते, अस सांगत त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना ईडी संदर्भात खुल चॅलेंज दिले. पण त्यांनी कुणावर आरोप केले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Yashomati Thakur, Congress
Pune Political News : मोदी सरकारला हटवण्यासाठी महाराष्ट्रातील समाजवादी संघटना एकत्र ; इंडिया आघाडीला पाठिंबा..

खासदार संजय राऊत, आमदार नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेतेमंडळींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेशही केला. काही दिवसांपूर्वीच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तर हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पण त्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांचे काही सहकारी भाजपसोबत सत्तेत सामील झाले.

Yashomati Thakur, Congress
Jayakwadi Water Supply : समन्यायी पाणी वाटपावरून पश्चिम महाराष्ट्र - मराठवाड्यात संघर्षाची ठिणगी ; लोकप्रतिनिधीही चिंतेत

शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. मात्र अफवा भाजप जाणीवपूर्वक पसरवत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com