Eknath Khadse News : एकनाथ शिंदे ऑटोचालक होते, म्हणून त्यांनीच ‘हा’ प्रश्न सोडवावा !

Police : भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.
Eknath Khadse and Eknath Shinde
Eknath Khadse and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council News : राज्यातील कायदा सुव्यवस्था कधी नव्हे येवढी ढासळली आहे. सरकारचे नियंत्रण नाही. पोलिस यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. पोलिस अधिकारी मुजोर झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण पाहिले तर देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, आदी मुद्द्यांवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना खडसे म्हणाले, २ मार्च २०२३ रोजी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या बालिकेचे अपहरण करून अत्याचार करण्यात. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. आमदार प्रज्ञा सातव याच्या ८ फेब्रुवारी २०२३ हल्ला झाला. मात्र त्याचे सूत्रधार अजूनही शोधले नाही.

लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगार शोधले जात नाही. महाराष्ट्राचे पोलिस एडीजी सरंगल यांनी ट्रॅफिक पोलिसांच्या बदल्यांमध्ये ३ लाख रूपये घेतले. सरंगल आता निवृत्त होत आहे. त्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होती. पण झाली नाही. सरकार कुणाला पाठीशी घालते आहे. ६८ दिवस माझा फोन टॅप केला.

कुलाबा पोलिस स्टेशनला मी फिर्याद दाखल केली. रश्मी शुक्लांना क्लिन चिट मिळाली, प्रमोशनही मिळाले. कुणाच्या आदेशाने फोन टॅप केला, उपयोग कुणासाठी केला, या प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळाली नाहीत. ब्रिजेश सिंह प्रिंसीपल सेक्रेटरी नेमले आहेत. आजपर्यंत हे पद आयएएस अधिकाऱ्यांचे असायचे. पण फडणवीस यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक आयपीस अधिकारी नेमला का, असा प्रश्‍न खडसे यांनी केला.

Eknath Khadse and Eknath Shinde
Eknath Khadse News: खडसे संतापले; म्हणाले, इमारती सरकारला फुकटात कोण देणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑटोचालक होते. ते मुख्यमंत्री बनल्याचा अभिमान आहे. महिलांना ५० टक्के आरक्षणाचेही आम्ही स्वागत केले. ५० टक्के ऑटोचालक, टॅक्सीचालक, कालीपीली चालक यांचे उत्पन्न त्या निर्णयामुळे कमी झाले. ते चिंतेत आहेत. एका बाजूला चांगला निर्णय घेतला. पण दुष्परिणाम टॅक्सीचालकावर झाला. कर्ज घेऊन गाड्या घेतल्या. ऑटोचालकांना मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी. शिंदेंना ऑटोचालकांच्या व्यथा माहिती आहेत. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेला हा प्रश्‍न त्यांनीच आता सोडवावा.

समृद्धी महामार्गाचा विषय सातत्याने चर्चेत आला. मोदी कन्स्ट्रक्शनला १६०० कोटी रुपयाची रॉयल्टी माफ केली. ती कशासाठी, याचे उत्तर अजूनही सरकारने दिले नाही. न्यायालयानेही सांगितले की वसूल केले पाहिजे. सरकार न्यायालयाचेही ऐकत नाही. खनिकर्माच्या बाबतीत एसआयटी नेमण्यात आली नव्हती. ती माझ्या बाबतीत लावण्यात आली. छळवणूक करून मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे. माझ्याविरोधात अनेक खोट्या केसेस टाकून ठेवल्या आहेत. एसपी आणि साक्षीदारांवर दबाव आणला जात आहे.

Eknath Khadse and Eknath Shinde
Eknath Khadse News : महापालिकांमधील नामनिर्देशीत सदस्य संख्येत वाढ भ्रष्टाचारासाठी ?

जळगाव (Jalgaon) शहरात तक्रार नोंद करावी म्हणून रात्रभर मी आंदोलन केले. पण नोंद झाली नाही. दूध फेडरेशनचा आमदार आहे, तो खडसे परिवारावर एफआयआर दाखल होणार, असे सांगतो. तुमचे सरकार, तुमचे गृहमंत्री आहेत, म्हणून असे धंदे करता का. गुटखा, दारू, मटका सर्रास सुरू आहे.

एक कोटीचा गुटखा मी स्वतः पकडून दिला. एका महिन्यात दीड लाखाचा गुटखा पकडला. ७० गावठी पिस्तूल पकडले. चोपडा येथे कारखाना आहे. बनावट पिस्तूल बनवतात. पोलिस (Police) फक्त हप्ते घेतात. मी तक्रार केली की, हप्ते वाढवून घेतले जातात, असे गंभीर आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com