Election News: कार्यकर्त्यांचा खर्च करून इच्छुक उमेदवार बेजार, केव्हा होणार निवडणूक ?

Leaders waiting for Municipal Corporations' Election: अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती.
Leaders' Akola
Leaders' AkolaSarkrnama

Akola News: मुंबई, नागपूरसह राज्यातील मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. जवळपास गेल्या वर्षभरापासून महानगरपालिकांवर प्रशासक बसवलेले आहेत. इकडे निवडणुकीची वाट पाहता पाहता इच्छुक उमेदवार थकले आहेत. कार्यकर्त्यांचा खर्च करून ते बेजार झालेले आहेत.

अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपकडे ४८ सदस्य व इतर सदस्यांचा पाठिंबा होता. काँग्रेसकडे १३ सदस्य होते. शिवसेनेचे आठ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य होते. वंचित बहुजन आघाडीचे तीन सदस्य होते. यांपैकी बहुतांश सदस्य पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारी होते.

वर्षभरापासून निवडणूकच जाहीर झाली नाही. त्यामुळे कार्यकर्ते सांभाळताना होणारा खर्च करून इच्छुक उमेदवार बेजार झाले आहे. काहींनी तर पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी सुरू केलेली तयारीही त्यांच्या स्तरावरून थांबवत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीला फाटा देण्यास सुरुवात केली आहे.

काय म्हणतात पदाधिकारी?

लोकशाही तुडवत विरोधी पक्षांचे खच्चीकरण केले जात आहे. मोदींच्या राज्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीला बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षभरापासून निवडणूक झालेली नाही. नियमानुसार सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे अनिवार्य आहे.

Leaders' Akola
Akola : निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये? ‘यांनी’ दाखल केली याचिका!

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड आणि कसब्यातील पोटनिवडणुकीनंतर भाजपला निवडून येण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने कारभार केला जात आहे. विरोधी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवणे व त्यांचे खच्चीकरण करणे, अशा पद्धतीने येथे कारभार सुरू आहे, असे शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा म्हणाले.

भाजपमध्ये (BJP) लोकांपुढे जाऊन निवडणूक लढण्याचे धाडस राहिलेले नाही. ज्याप्रमाणे अकोला (Akola) महानगरपालिकेत अमृत योजनेत अनियमितता झाली, स्वच्छ भारत योजनेतील शौचालयाचा घोटाळा समोर आला, लोकांना कोणत्याही सुविधा न देता मालमत्ता कर वाढून त्याची बळजबरीने वसुली सुरू करून लोकांना त्रास दिला जात आहे. ते बघता निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपुढे गेल्यास भाजपला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. हीच परिस्थिती इतर महानगरपालिकांमध्येसुद्धा (Municipal Corporation) आहे. त्यामुळे निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- डॉ. झिशान हुसेन, काँग्रेस नेते, तथा माजी विरोधी पक्ष नेता मनपा, अकोला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com