प्रेक्षक गॅलरीत बसलो म्हणजे आम्ही प्रेक्षकांसारखं मुकं रहायच काय ? जोरगेवार संतापले...

आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) आक्रमक झाल्यानंतर लगेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थन केले.
MLA Kishor Jorgewar

MLA Kishor Jorgewar

Sarkarnama

Published on
Updated on

नागपूर : आम्हाला तुम्ही तारांकित प्रश्नांची छापील पुस्तिका देत नाही, बोलायला संधी देत नाही आम्ही प्रेक्षक गॅलरीत बसलोय म्हणजे आम्ही प्रेक्षकांसारखं मुकं राहायचं का, असा प्रश्‍न करीत आज आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी संताप व्यक्त केला. त्यांची ही आक्रमता पाहून सभागृह स्तब्ध झाले.

आमदार जोरगेवार आक्रमक झाल्यानंतर लगेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थन करत प्रेक्षक गॅलरीतील सभासदांना तात्काळ प्रश्नपत्रिका देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अधिवेशनादरम्यान काही आमदारांच्या बसण्याची व्यवस्था प्रेक्षक गॅलरीत करण्यात आली आहे. मात्र येथील आमदारांना सभागृहाच्या कामकाजाबाबतची माहिती उपलब्ध करून दिल्या जात नाही.

त्याअर्थी सभागृहात एकही कोरोनाबाधित नाही, मग...

सभागृहात सुरू असलेल्या या प्रकारावर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. जोपर्यंत आम्हाला छापील प्रश्नपत्रिका दिल्या जात नाही, तोवर हा प्रश्न क्रमांक पुढे जाऊ देऊ नका, असा पवित्रा यावेळी त्यांनी घेतला. तसेच आरटीपिसिआर टेस्ट केल्याशिवाय कोणत्याही सदस्याला सभागृहात प्रवेश नाही. याचा अर्थ येथे कोरोनाबाधित नाही, असा होतो, असे असतानाही आम्हाला प्रेक्षक गॅलरीत बसविले जात आहे. ही आसन व्यवस्था बदलविली गेली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रत्येकाला सहभागी होण्याचा अधिकार : विजय वडेट्टीवार

सभागृहात खाली बसलेले असो वा प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रत्येक सदस्यांचे अधिकार समान आहेत. त्यामुळे सभागृहातील सर्व सदस्यांना छापील प्रश्‍नपत्रिका दिल्या गेल्या पाहिजेत. आमदार जोरगेवार यांना त्यांच्या मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्‍न मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे येथे प्रत्येक सन्माननीय सदस्यांच्या भावना सभागृहाने समजून घेतल्या पाहिजे, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

<div class="paragraphs"><p>MLA Kishor Jorgewar</p></div>
...तर वेकोलिचे कोळसा उत्पादन बंद पाडू : आमदार किशोर जोरगेवार

येवढा स्टाफ काय झोपा काढतो का? : अजित पवार

विधिमंडळावर खूप खर्च होतो, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. त्याची चर्चा करता येत नाही. पाच दिवस, अन् सात दिवसांचं अधिवेशन असतं, तर येवढा मोठा स्टाफ काय करतो? काय झोपा काढतो काय? प्रत्येक दारावर तुम्ही माणसं उभी करता, त्यांना काम काय? प्रत्येक आमदार प्रवेश करीत असताना त्यांच्या हातात प्रश्नोत्तराचे पुस्तक सहज देता येते. त्यातल्या त्यात वरच्या गॅलरीत बसलेल्या सदस्यांसाठी हे तर करताच येईल. आमदार जोरगेवार यांचे म्हणणे अगदी योग्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सदस्यांना पुस्तिका देण्याचा आदेश दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com