Mohan Mate म्हणाले, त्यांच्यामुळे साधा कुत्राही पळत नाही, तर मग...

Nagpur : आमदार मोहन मते धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
Dhirendra Maharaj and Mohan Mate
Dhirendra Maharaj and Mohan MateSarkarnama

Bageshwar alias Dhirendra Krishnaji Maharaj News : बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्णजी महाराज यांचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान न स्वीकारता त्यांनी नागपुरातून पळ काढला. तेव्हापासून अंनिस याचा पाठपुरावा करीत आहे. आता दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहे.

आमदार मते (Mohan Mate) धीरेंद्र महाराजांच्या रामकथा प्रवचनाच्या आयोजकांपैकी एक आहेत. नागपुरात (Nagpur) आयोजित रामकथा प्रवचनादरम्यान आणि त्यानंतरही वादग्रस्त ठरलेले धीरेंद्र महाराज यांची पाठराखण आमदार मते यांनी केली आहे. आम्ही दिलेल्या आव्हानामुळे धीरेंद्र महाराज नागपुरातून पळाले, असा दावा अंनिसचे संस्थापक श्‍याम मानव (Shyam Manav) यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना आमदार मते म्हणाले, त्यांच्यामुळे साधा कुत्राही पळत नाही. तर धीरेंद्र महाराज कसे पळतील? त्यांना अशा वल्गना करणे बंद केले पाहिजे. श्‍याम मानव जिथे कुठे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात, तेथील लोकांना माहिती आहे की, त्यांची लायकी काय आहे. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी श्‍याम मानव यांनी हे प्रकरण उचलून उभे केले आहे.

त्यांच्यात हिंमत असेल तर अन्य धर्मीयांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांनी सांगावे की, हे कार्यक्रम बंद करून अंधश्रद्धा पसरविणे थांबवा. हिंदू धर्मीयांच्या साधू संतांना बदनाम करणे, हा अंनिसचा अजेंडा आहे, असा आरोप आमदार मते यांनी केला. मी श्‍याम मानव यांना सांगतो की, कुठे कुठे, काय काय सुरू आहे. त्यांनी तेथे जाऊन कारवाई करण्याचे आव्हान आमदार मोहन मते यांनी अंनिसला दिले आहे.

Dhirendra Maharaj and Mohan Mate
Pune News : राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचले : पुण्यात पुन्हा ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ अशी बॅनरबाजी

केवळ हिंदू धर्मालाच त्यांनी टारगेट केले आहे. हा हिंदू आणि सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू. धीरेंद्र महाराजांना परमेश्‍वराचा आशीर्वाद आहे, या गोष्टीचेही आमदार मते यांनी समर्थन केले आहे. आतापर्यंत धीरेंद्र महाराज आणि अंनिसमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आमदार मतेंनी उडी घेतली आहे. हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com