पटोलेंच्या इशाऱ्याला देशमुखांकडून केराची टोपली...

जिल्हा काँग्रेस कमेटीच्या बैठकीत देशमुख यांची हकालपट्टी करण्याचा ठरावही करण्यात आला आहे.
Nana Patole, Ashish Deshmukh
Nana Patole, Ashish Deshmukhsarkarnama

नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे काँग्रेसमध्ये (Congress) खळबळ उडाली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देशमुखांना कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, देशमुख यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार सुरुच ठेवला आहे. या संदर्भात देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिली नाही. त्यामुळे पटोले यांच्या इशाऱ्याला देशमुखांनी केराची टोपली दाखवली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Nana Patole, Ashish Deshmukh
पंकजा मुंडेंना मोठा धक्का; समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पटोले अकोल्यामध्ये बोलताना म्हणाले होती की ''पक्ष विरोधी कारवाई करणारा कोणी कितीही मोठा असो त्याच्यावर कारवाई होणारच. माझ्याकडे जी माहिती आली आहे, त्या माहितीची एकदा निरीक्षक नियुक्त करून पडताळणी करणार. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले होते.

सावरगाव सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाने पार्वती काळबांडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आशिष देशमुख उपस्थित होते. देशमुख व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्यातील वाद उफाळून आल्यानंतर देशमुखांच्या निष्ठेवरच कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केदार समर्थकांनी देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

Nana Patole, Ashish Deshmukh
मोठी बातमी : भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून कंपनीच्या संचालकास अटक

जिल्हा काँग्रेस कमेटीच्या बैठकीत देशमुख यांची हकालपट्टी करण्याचा ठरावही करण्यात आला आहे. केदार यांनी जे पक्षविरोधी कारवाया करीत असतील त्यांना गाडीतून खेचून ठोका असे वक्तव्य केले होते. हा सर्व वाद सुरू असताना देशमुख यांनी भाजपच्या उमेदवार काळबांडे यांच्या घरी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यानंतरही देशमुख यांनी सोमवारी कळबांडे यांच्या प्रचार यात्रेत सहभागी होऊन केदार यांना खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा सवाल कार्याकर्त्यांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, सुनील केदार पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्यासाठी ते विविध ठिकाणी सध्या सभा घेत आहेत. केदार काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्यामुळे तर देशमुख यांनी भाजप उमेदवाराची भेट घेतली नाहीना अशी चर्चा नागपूरमध्ये सुरु आहे. मात्र, केदार आणि देशमुख यांच्यातील वादामुळे पक्षाच्या उमेदवाराचे टेन्शन मात्र वाढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com