Dhananjay Munde, Jayant Patil
Dhananjay Munde, Jayant Patilsarkarnama

पंकजा मुंडेंना मोठा धक्का; समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जयंत पाटील यांची सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे.
Published on

बीड : गोपीनाथ मुंडे यांचे जुने व अत्यंत निकटचे सहकारी, तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्या हस्ते व धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Namdevrao Aghav joins NCP)

Dhananjay Munde, Jayant Patil
प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन राजकारणात येणार?

आघाव यांच्याबरोबर वैद्यनाथ कारखान्याचे संचालक माधवराव मुंडे, अश्रूबा काळे, भाऊसाहेब घोडके, माऊली मुंडे, किसनराव शिनगारे, पांडुरंग काळे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

जयंत पाटील यांची सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. ते बीडमध्ये विविध ठिकाणी कार्याकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याच्या या यात्रे दरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, गेवराईची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. ती शंभर टक्के निवडून येईल, अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली. परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी गेवराई मतदारसंघाचा आढावा पाटील यांनी घेतला.

Dhananjay Munde, Jayant Patil
अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला

या बैठकीस १०० टक्के बूथ अध्यक्ष उपस्थित आहेत. परिवार संवाद यात्रेत गेवराई हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे इतके चांगले नियोजन आहे. इथल्या बुथ अध्यक्षांच्या नियमित बैठका झाल्या आहेत. त्यांना नियमित कार्यक्रम दिले तर २०२४ साली गेवराई मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com