भाजपवर मोठी नामुष्की : भ्रष्ट कारभारामुळे आपल्याच नगराध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी!

भाजपने शहरात विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले.
Priya Bondre, 
Kunal Bondre
Priya Bondre, Kunal Bondre sarkarnama

चिखली (जि.बुलडाणा) : येथील नगरपरिषदेच्या (Municipal Council) नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व त्यांचे पती कुणाल यांची आज (ता.२०) भाजपमधून (BJP) हकालपट्टी करण्यात आली. चिखली भाजप शहर अध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत बोंद्रे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा केली. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलीतील (Chikhli) राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली.

नगराध्यक्षा व त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांना पक्षाने वारंवार सांगूनही नगरपालिकेतला भ्रष्टाचार कमी झाला नाही. त्यांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले. पक्षातील ज्येष्ठांकडे त्यांच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे, जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांचे आदेशानुसार नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि कणाल बोंद्रे यांना भाजपमधून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, ॲड. मंगेश व्यवहारे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, रामकृष्ण शेटे, रामदास देव्हडे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शहरामध्ये झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेल्या कामांची यादी देखील त्यांनी दिली.

Priya Bondre, 
Kunal Bondre
शरद पवारांच्या नंतर अजितदादाही उतरणार मैदानात

२०१६ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपकडून प्रिया बोंद्रे ह्या थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला दिला. बोंद्रे यांनी या निधीचा पारदर्शकपणे वापर करण्याऐवजी यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. चिखली शहराचा चेहरा मोहरा बदलण्याकरिता कधी नव्हे एवढा निधी पालिकेला मिळाला. परंतु नगराध्यक्षा बोंद्रे यांच्या भ्रष्टकारभाराने कळस गाठल्यामुळे पक्षाची हानी झाली. गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत भाजप हा स्वच्छ पक्ष असुन कारभार व स्वच्छ प्रशासन हे भारतीय जनता पक्षाचे ब्रीद असल्याचे, देशमुख यांनी सांगितले.

Priya Bondre, 
Kunal Bondre
भाजपकडून असाही गौरव; माजी मुख्यमंत्री ठरले 'सुपर कोरोना वॉरियर'!

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नगराध्यक्षा व त्यांचे पतींवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत हकालपट्टीच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असतांना नगराध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आणता येत नसल्याचे माहित असल्याने जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याकरिता भाजपने हा खटाटोप तर केला नाही ना असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. यापूर्वी शहरामध्ये केलेल्या विविध विकासकामांच्यावेळी भाजपच्या इतर नगरसेवकांसह पक्षश्रेष्ठींनी कोणत्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित न करता नेमक्या याच वेळी ही कारवाई केल्यामुळे भाजपच्या दिव्याखाली अंधार असल्याची जोरदार चर्चा शहरात होत आहे. तसेच भाजपने शहरात झालेल्या विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिमे विषयीदेखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com