Devendra Fadnavis News: फडणवीसांनी मान्य केला विरोधी पक्षनेत्यांचा ‘तो’ मुद्दा, त्यावर बोलतही होते; पण…

Eknath Khadase : एकनाथ खडसेही कांदा आणि कापसाच्या मुद्यावर आक्रमक झाले.
Ambadas Danve and Devendra Fadnavis
Ambadas Danve and Devendra FadnavisSarkarnama

Budget sessions 2023 News : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सकाळी विधान परिषदेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कांद्याचा मुद्दा उचलून धरला. सर्वात आधी हा मुद्दा चर्चेला घ्या, असे म्हणत ते आपल्या भूमिकेवर आग्रही होते. त्यांनी बाजू मांडल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा मुद्दा मान्य केला.

अंबादास दानवेंनी कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सभागृहाला सांगितली. त्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही कांदा आणि कापसाच्या मुद्यावर आक्रमक झाले. यावरून त्यांनी गिरीष महाजनांनाही खरेखोटे सुनावले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे झाले. ते म्हणाले विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला मुद्दा गंभीर आहे आणि योग्य आहे. सद्यःस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे. कापसावरही संकट आहे, ते नंतर सांगतो.

देशात कांद्याचे ४० ते ४५ टक्के उत्पादन आपण करतो. पूर्वी जो वरचा भाग होता, जसे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि पंजाबपर्यंत कांद्याला बाजारपेठ होती. आता ती राज्ये स्वतः कांदा उत्पादक झाली आहेत. आज ९ राज्ये कांद्याचे उत्पादन घेतात. पूर्वी आपण कांद्याची निर्यात करायचो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले की, इतर देशांत कांद्याची आवश्‍यकता आहे. पण त्यांच्याकडे फॉरेन करन्सी नाही. त्यामुळे ते निर्यातीला परवानगी देत नाहीत.

देशातले आणि आंतरराष्ट्रीय मार्केट सद्यःस्थितीत अडचणीत आहे. परवापासून नाफेडने कांद्याची खरेदी सुरू केली आहे. पूर्वी ते ग्रेडींग करायचे. लाल कांदा घेणार नाही, छोटे कांदे घेणार नाही, अशा त्यांच्या अटी असायच्या. पण आता त्या अटी नाफेडने लादलेल्या नाहीत. शेतकऱ्यांचा कांदा ते सरसकट खरेदी करणार आहेत. केंद्र सरकारच्या मार्केटिंग विभागाकडून नाफेडचे काम चालते. कृषी विभागाची ५० टक्केची योजना आहे. त्यामध्येही आपण खरेदी सुरू करतो आहे.

Ambadas Danve and Devendra Fadnavis
Fadanvis : दोन-अडीच महिन्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असावा !

२०१७-१८ साली असंच संकट आलं होते. तेव्हा आपण शेतकऱ्यांना (Farmers) मदत केली होती. आताही शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) हे बोलत असताना विरोधकांनी गदारोळ सुरू केला आणि त्यांनी बोलणे थांबवले. नंतर प्रवीण दरेकर उभे झाले आणि चिडून म्हणाले की, विरोधकांना केवळ राजकारण (Politics) करायचे असेल, तर ते गोंधळ घालतील आणि शेतकऱ्यांची कणव असेल तर सरकारचे म्हणणे ऐकतील. तरीही गदारोळ सुरूच होता. शेवटी फडणवीसांचे बोलणे अर्धवटच राहिले आणि सभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com