Fadanvis : फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन करू पाहणाऱ्या व्यवस्थापिकांना ‘हनुमान चालिसा’ पावली !

Agitation : देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Devendra Fadanvis News : मानधनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या बचत गटांच्या संघ व्यवस्थापिकांना हनुमान पावला. सर्वांना मासिक १० हजार रुपये मानधन आणि दरवर्षी त्याच पाच टक्के वाढ देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

‘युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेचे निहाल पांडे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील बचतगटाचे काम करणाऱ्या ४२ प्रभाग संघ व्यवस्थापक महिला तब्बल १० दिवसांपासून संविधान चौकात उपोषणाला बसल्या होत्या. या दरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तांना सांगून त्यांच्यासोबत भेटण्यास सांगितले होते. त्यानुसार आंदोलन थांबवण्यात आले होते.

बुधवारी महाराष्ट्र (Maharashtra) राज्य जीवनोन्नती अभियान प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी जिल्हा व्यवस्थापक स्वाती वानखेडे यांच्यामार्फत निर्देश पत्र आले. तत्पूर्वी १४ तारखेला वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी रोहन घुरे यांनी बैठक घेतली. त्यानुसार जे प्रभाग संघ व्यवस्थापक महिलांबरोबर तीन हजार, चार हजार, पाच हजार रुपये मानधनाचे करार होत होते, ते सरसकट १० हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. त्यात दरवर्षी पाच टक्के वाढ केली जाणार आहे.

Devendra Fadanvis
Kasba By-Election News : कसब्यात प्रचाराची रणधुमाळी अन् फडणवीस बापटांच्या भेटीला

जो प्रभाग संघ तोट्यात आहे, या प्रभाग समूहांना समूह गुंतवणूक निधी सीआयएफ फंड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या प्रभाग व्यवस्थापक महिलांचे मानधन शासनातर्फे (State Government) देण्यात यावे, असा प्रस्ताव वर्धा (Wardha) जिल्हा प्रशासनाद्वारे विभागीय आयुक्तांद्वारे (Divisional Commissioner) शासनाकडे पाठवण्यात आला. त्यामुळे हनुमान चालिसा आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे निहाल पांडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com