Kasba By-Election News : कसब्यात प्रचाराची रणधुमाळी अन् फडणवीस बापटांच्या भेटीला

Devendra Fadnavis and Girish Bapat Meeting : ''कसबा मतदारसंघात प्रचार कसा पाहिजे, या संदर्भात बापटांनी मला टिप्स दिल्या...''
Devendra Fadnavis and 
Girish Bapat
Devendra Fadnavis and Girish BapatSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad and Kasba By-Election : कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून आहेत. सर्वांनीच आपली ताकद पणाला लावलीय. असे असतानाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे.

गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस फडणवीसांनी केली. यावेळी कसबा पोटनिडणुकीसंदर्भात काही चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही बापट यांची भेट घेतली होती.

Devendra Fadnavis and 
Girish Bapat
Pune News : ...पण शेवटी विजय हा पांडवांचाच झाला; चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

बापटांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले. तसेच कसबा पोटनिवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेते गिरीश बापट यांची भेट घेत आहेत. कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि बापट यांची भेट महत्वाची मानली जात आहे.

Devendra Fadnavis and 
Girish Bapat
Kasba By-Election : कसब्यात मनसे-राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली : 'ट्विटर वॉर' सुरूच..

या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''बापटसाहेब आमचे नेते आहेत. आज त्यांची मी भेट घेतली. त्यांची प्रकृती चांगली वाटली यात मला आनंद आहे. त्यांना कसबा मतदारसंघाची काळजी आहे.''

''कसबा मतदारसंघात प्रचार कसा केला पाहिजे, या संदर्भात बापटांनी मला टिप्स दिल्या आहेत. त्यांचे लक्ष या निवडणुकीकडे आहेच. मला वाटतंय कसबा असो किंवा चिंचवड भाजप दोन्ही ठिकाणी निवडून येईल'', असं फडणवीस म्हणाले. तसेच अमित शाह हे पुणे दौऱ्यावर येत आहेत. मात्र, या निवडणुकीसाठी ते येत नाहीत. शिवसृष्टीसाठी ते येत आहेत. असंही यावेळी त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com