Devendra Fadnavis News: जुन्या पेन्शनवर फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, ते आजच निवृत्त होत नाहीये..

Retired Employee : त्यानंतर निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadanvis on Old Pension Scheme : जुन्या पेन्शनचा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही सभागृहात प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यावर सरकार या मुद्यावर नकारात्मक अजिबात नाही. पण आर्थिक ताळेबंद कसा बसवायचा, याचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केवळ जुनी पेन्शन देणे, हा एकच मुद्दा सरकारसमोर नाहीये, तर राज्यातील सर्व समाजांना योजना देणे, एससी, एसटी प्रवर्गाच्या लोकांची कामे, रस्ते आणि पुल बांधणे, ही सर्वच कामे करायची आहेत. राहिला जुन्या पेन्शनचा प्रश्‍न तर कर्मचारी काही आजच निवृत्त होत नाहीये. २००५ मध्ये नोकरीत लागलेले कर्मचारी २०२८ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यानंतर निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर सारासार अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

तुम्ही १७ वर्ष सत्तेत होता, अन् आम्हालाच विचारता..

विरोधकांनी जेव्हा हा मुद्दा लावून धरला तेव्हा, तुम्ही १७ वर्ष सत्तेत होता, अन् आता आम्हालाच विचारता का, असा सवाल करीत फडणवीसांनी विरोधकांना सुनावले. आमच्या आधी तुम्ही सत्तेत होता, तुम्हाला तेव्हा संधी होती. पण तुम्ही जुन्या पेन्शनचा (Old Pension) प्रश्‍न निकाली काढला नाही. हा प्रश्‍न निर्माण झाला, तेव्हापासून आम्ही पाचचं वर्ष सत्तेत होतो. बाकी १७ वर्ष तुम्ही होता आणि १७ वर्षवाले पाचवर्ष वाल्यांना विचारत आहेत, हे योग्य नाही, असंही फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

Devendra Fadanvis
Fadanvis : दोन-अडीच महिन्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असावा !

मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा करू..

मान्यताप्राप्त संघटनांनी जो आराखडा तयार केला आहे, त्याचाही अभ्यास करणार आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्यासोबत बसणार आहे. त्यांनी दिलेला पर्याय जर पटला तर तो स्वीकारायची आपली तयारी आहे. हा सरकारसाठी (Maharashtra Government) प्रेस्टीज इश्‍यू अजिबात नाही. आजच हा निर्णय घेतला, तर पुढच्या सरकारवर बोझा पडेल आणि ती आमची इच्छा नाही.

मान्यताप्राप्त सर्व संघटनाशी बोलल्यानंतर मग नियोजन सचिवांसोबत चर्चा होईल. निर्णय आजच्या कर्मचाऱ्यांना वेगळा आणि पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना वेगळा, असा करता येणार नाही. केवळ घोषणेनी मार्ग निघणार नाही, तर पर्यायांचा विचार करावा लागेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com