Fadanvis : गुन्हा दाखल असतानाही सावकाराने वसूल केले १४ लाख; त्यावर फडणवीस म्हणाले...

Moneylending Act : सावकारी अधिनियम कायदा २०१४ कलम १७ अन्वये कारवाई केली जाते.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Mumbai Legislative Councils News : अतिरिक्त व्याज आकारून लुटल्याप्रकरणी एका सावकारावर गुन्हा दाखल होता. पण त्याच्यावर अटकेची कारवाई पोलिसांनी केली नाही. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल असतानाही त्या सावकाराने तब्बल १४ लाख रुपयांचे व्याज वसूल केले. ही घटना पलूस येथे घडली. आमदार उमा खापरे यांनी आज हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. (An interest of Rs.14 lakhs was recovered)

सभागृहाला माहिती देताना आमदार खापरे म्हणाल्या, सावकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. अवैधपणे बळकावलेल्या मालमत्तेवर सावकारी अधिनियम कायदा २०१४ कलम १७ अन्वये कारवाई केली जाते. पण गुन्हा दाखल असतानाही सावकाराने १४ लाख रुपये व्याज वसूल केले. त्रासाला कंटाळून पिडीत पोलिस रात्री २ वाजता पोलिस ठाण्यात गेला. पण अद्याप त्याला न्याय मिळाला नाही.

राज्यात अशा घटना सातत्याने सतत घडत आहेत. पोलिस अधीक्षक बसवराज तेलींनी चौकशी केली पाहिजे. सावकार २५ ते ३० टक्के व्याजाने पैसा देतात आणि धमकावून तो वसूल केला जातो. नाशिकमध्येही अशा घटना झाल्या आहेत. पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने सहकार खात्याकडे धाव घेतली. पण पोलिस कारवाई आणि त्याच्याशी संबंधित कागदपत्रे नसल्यामुळे तेसुद्धा हतबल होतात, असे उमा खापरे म्हणाल्या.

पिंपरी चिंचवडच्या एका महिलेने पतीच्या आजारपणात सावकाराकडून १ लाख रुपये घेतले. ती दरमहा १० हजार देत होती. दोन वर्ष नियमितपणे तिने हे पैसे दिले. एकूण २ लाख ४० हजार रुपये तिने दिले. पण तरीही तिचे कर्ज फिटले नाही. तिने माझ्याकडे कैफियत मांडली. पोलिसांकडे जाऊ असे तिला सांगितले. पण ‘अडचणीच्या काळात त्याने मदत केली. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार नाही करणार’, असे ती म्हणाली. अशा बऱ्याच प्रकरणांत तक्रारी होत नसल्याने सावकारांचे फावते. याकडेही उमा खापरे यांना सभागृहाचे लक्ष वेधले.

Devendra Fadanvis
Fadanvis : दोन-अडीच महिन्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असावा !

बॅंकांकडे (Bank) थकबाकी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागते. सावकारांवरील गुन्हे कागदोपत्री सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे फावते. पण गुन्हा दाखल असताना सावकाराचे धाडस होते कसे, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सावकार विरोधी कायद्यामध्ये त्रुटी आहेत. त्यासाठी विद्या चव्हाण समिती नेमली होती. त्यामध्ये मीसुद्धा होतो. अशी आठवण त्यांनी गृहमंत्री फडणवीसांना करवून देत त्या समितीचा अहवाल मागवण्याची सूचना केली.

यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendfa Fadanvis) म्हणाले, अवैध सावकारीच्या विरोधात आपण कायदा केला आहे. सावकारांना वैध परवाना आपण दिला आहे. पण काही लोक अवैध सावकारी करतात. त्यांच्यावर कारवाई करत असतो. सांगलीत तक्रारी होत्या गेल्या २ ते ३ वर्षांत गुन्हे दाखल केलेले आहेत. २०२० मध्ये १४ गुन्हे, २०२१ मध्ये ३५ गुन्हे आपण दाखल केले. २०२२ आणि यावर्षीसुद्धा गुन्हे दाखल केले आहेत आणि सर्व प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे.

Devendra Fadanvis
आणीबाणीत सावकार रडकुंडीला आले होते आणि लाचखोरीलाही आळा बसला होता..

अवैध सावकारीत कुणीही अडकले असेल, तर त्यांनी तक्रार करावी. त्यावर तात्काळ कारवाई केली. गुन्हा दाखल झाल्यावर पैसे वसूल केले असेल, तर सावकारावर आणि संबंधित पोलिसांवरही (Police) कारवाई करू. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्यानुसार, विद्या चव्हाण समितीचा अहवाल मागवून त्यात सुधारणा करण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com