Akola : फडणवीसांनी शब्द दिला अन् ‘वंचित’ने जिल्हा परिषदेची सत्ता राखली

ॲड. प्रकाश आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanis) यांनी दिला शब्द शेवटपर्यंत पाळला आणि ‘वंचित’ने जिल्हा परिषदेवरील सत्ता राखली.
Devendra Fadanvis, Akola ZP
Devendra Fadanvis, Akola ZPSarkarnama
Published on
Updated on

अकोला : महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग करून प्रहार जनशक्ती पक्षासह अपक्षांंना सोबत घेत शिवसेना, काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीपुढे आव्हान उभे केले होते. मात्र, ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला शब्द शेवटपर्यंत पाळला आणि ‘वंचित’ने जिल्हा परिषदेवरील सत्ता राखली. उर्वरित काळाकरिता अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या संगिता नंदकिशोर अढाऊ यांची तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांची निवड झाली.

अकोला जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही ओबीसी आरक्षणामुळे पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली होती. ही मुदत संपल्यामुळे ता. १७ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यापूर्वी जिल्हा परिषद सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्‍ट्रवादी काँग्रेसने प्रहार व अपक्षांना पुढे करीत दोन पदे मिळविली होती. त्यावेळी वंचितकडे संख्याबळ कमी असल्याने हा प्रयोग भाजपते पाच सदस्य तटस्थ राहिल्यानंतरही यशस्वी झाला होता.

आता अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीतही हा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यावेळी वंचितकडे २५ तर महाविकास आघाडीकडे २३ मते होती. त्यामुळे भाजपची साथ मिळावी किंवा वंचितकडे असलेल्या अपक्षांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न झाला. या सर्व घडामोडीमध्ये भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शब्द मागितला. या शब्दाला फडणवीस जागले आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपचे पाचही सदस्य गैरहजर राहिले. दुसरीकडे वंचितला त्यांचे २५ ही मत एकसंघ ठेवण्यात यश आल्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्ता राखण्यात ‘वंचित’ यशस्वी झाले.

Devendra Fadanvis, Akola ZP
Fadanvis : फडणवीस कडाडले; म्हणाले, ..तर अशा अधिकाऱ्यांना घरी बसवावं लागेल !

सलग तिसऱ्यांदा महिलेकडे नेतृत्व..

अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव होते. त्यामुळे सलग तिसऱ्यांना अकोला जिल्हा परिषदेचे नेतृत्व महिलेच्या खांद्यावर आले आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी संध्याताई वाघोडे यांच्याकडे अध्यक्षपद होते. निवडणुकीनंतर प्रतिभाताई भोजने यांच्याकडे अध्यक्षपद आले. आता महिलेसाठीच पद राखीव असल्याने सलग तिसऱ्यांदा महिलेकडे नेतृत्व आले. वंचितच्या संगीताताई अढाऊ या अकोला जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत उपाध्यक्षपदी कुणबी समाजातील युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली असून, सुनील फाटकर हे निवडून आले आहेत.

दोन मतांचा पडला फरक..

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने २५ विरुद्ध २३ अशा फरकाने अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर विजय मिळविला. फोडाफोडीचे राजकारण करण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांना अवघ्या दोन मतांनी पराभव पत्करावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com