`फडणविसांना वाटतंय की, सेनेचा काटा काढला; पण दिल्लीश्‍वरांनी त्यांचाच काटा काढलाय!`

अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. फडणवीसांनी (Devendra Fadanvis) मास्टरस्ट्रोक मारला, असे जे समजले जात आहे, ते चुकीचे आहे.
Atul Londhe and Devendra Fadanvis
Atul Londhe and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : २१ जूनपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जे वादळ उठलं होतं, ते आज शमेल असे वाटत असतानाच पुन्हा एक नवे वादळ राज्याच्या राजकारणात आले असल्याचे आजच्या घडामोडींवरून दिसतंय. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवून देवेंद्र फडणवीसांनी औदार्य दाखवलं, असा संदेश दे देऊ पाहात आहेत. पण त्यांनी शिवसेनेचा काटा काढला, असे नव्हे, तर फडणवीसांच्या दिल्लीश्‍वरांनी त्यांचा काटा काढला, असे खळबळजनक वक्तव्य कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. आपण शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानंतर पक्षाचे जे. पी. नड्डा यांनी जाहीरपणे फडणवीस यांना सूचना केली आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे सांगितले. त्यानंतर फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून आजच शपथ घेत आहेत. यात फडणवीस यांचे `डिमोशन` झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पदावर राहिलेला व्यक्ती उपमुख्यमंत्री होणार आहेत.

अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. फडणवीसांनी (Devendra Fadanvis) मास्टरस्ट्रोक मारला, असे जे समजले जात आहे, ते चुकीचे आहे. तर खरा मास्टरस्ट्रोक दिल्लीश्‍वरांनी मारला आहे. या सर्कसचे रिंगमास्टर दिल्लीत (Delhi) बसले आहेत, असे लोंढे यांचे म्हणणे आहे. फडणवीसांनी सकाळी पत्रकारांना सांगितले होते की, मी आज सायंकाळी मी मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेणार आहे. पण दिल्लीवरून जे पत्र आलं ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचं होतं, असा गौप्यस्फोटदेखील अतुल लोंढे यांनी केला आहे.

भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. मोदी, शहा यांच्या नंतर तिसऱ्या क्रमांकावर आज योगी आदित्यनाथ यांना ठेवलं जातंय. आता त्या तिसऱ्या स्थानावर फडणवीसांनी स्थानापन्न होऊ नये, याची पुरेपूर काळजी शीर्षस्थ नेतृत्वाने घेतली असल्याचेही लोंढे यांनी नमूद केलंय. सुरुवातीला शिवसेना आणि अकाली दलानेच भाजपला मदत केली. पण नंतर नंतर भाजपने या दोन पक्षांना महाराष्ट्रातून संपविण्याचा विडा उचलला. त्यासाठी एकनाथ शिंदेंना सोबत घेतले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चिन्ह घ्यायचे आणि मूळ सेना पूर्णपणे संपवायची, हा फडणवीसांचा डाव होता, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.

Atul Londhe and Devendra Fadanvis
अतुल लोंढे म्हणाले, एमआयएमने काँग्रेसची चिंता करू नये...

शिकार स्वतः जाळ्यात आला ?

मूळ शिवसेना संपविण्यासाठी भाजपने कंबर कसली होती आणि अशा परिस्थितीत शिकार स्वतः त्यांच्या जाळ्यात आला आणि हा मास्टरस्ट्रोक भाजपच्या दिल्लीश्‍वरांचा आहे, फडणवीसांचा नाही. फडणवीस आता हरणारा डाव खेळणार नाही, असे म्हटले जाते. पण ते हरणार डाव यापूर्वी खेळलेले आहेत. ते स्वतःला तेल लावलेला पहेलवान म्हणत होते. पण तेव्हा ८० वर्षांच्या योध्याने त्यांना धोबीपछाड पटकणी दिली होती, हे त्यांनी विसरू नये, असेही लोंढे म्हणतात. ज्यांच्या खांद्यावर खेळून ते वाढले, त्यांनाच संपवायला निघाले आहेत. याचा अर्थ त्यांचा शेवट नजीक आला असल्याचेही अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. फक्त येथे सेना संपवण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. त्यांची ही खेळी यशस्वी होईल, असे वाटत नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com