फडणीसांनी सांगितला, परिणय फुके पालकमंत्री झाल्यावर पहिल्या दौऱ्याचा 'तो' किस्सा..

डाॅ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांच्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, ते पट्टीचे जलतरणपटू आहेत. उत्कृष्ट टेनिसपटूदेखील आहेत आणि जलतरणपटू म्हणून त्यांनी राष्‍ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे,
Devendra Fadanvis and Dr. Parinay Fuke
Devendra Fadanvis and Dr. Parinay FukeSarkarnama

नागपूर : सामाजिक आणि राजकीय कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेल्या डॉ. परिणय रमेश फुके यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात २००७ साली नागपूर महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून केली. हिलटॉप या त्यांच्या प्रभागामध्ये ते सातत्याने अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून येत होते. आता त्यांच्या पत्नी तेथे नगरसेविका आहेत. सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून वने आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणूनदेखील मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे, असे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी सभागृहाला त्यांची ओळख करून देताना सांगितले.

परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांच्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, ते पट्टीचे जलतरणपटू आहेत. उत्कृष्ट टेनिसपटूदेखील आहेत आणि जलतरणपटू म्हणून त्यांनी राष्‍ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. टेनिस स्पर्धेतही राष्ट्रीय पातळीवर ते खेळलेले आहेत. सध्या महाराष्ट्र (Maharashtra) बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. चेस इन स्कूल सारख्या स्पर्धा आता नगर, धुळे, नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये होत आहेत. महाराष्ट्रातील अनेक बुद्धिबळपटूंना मदत मिळावी, म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली सातत्याने प्रयत्न होत राहिले आहेत. त्यांच्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय स्लम असलेला त्यांचा प्रभाग होता.

मागासवर्गीय समाज, गरीब लोक राहात असलेला हा परिसर होता. त्या भागामध्ये घरोघरी नळ योजना, सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते, शौचालय, २४ तास पिण्याचे पाणी आदी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. याशिवाय केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना तेथे राबविली. ज्यामध्ये झोपडपट्टीमधील लोकांना पक्की घरे देता आली. घराघरांत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि त्या बळावर सन २०१२ मध्ये पुन्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये २०१६ साली त्यांची निवड झाली. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील विकास कामांना चालना देण्याच्या दृष्टीने आणि तळागाळातल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. त्यांचे वडील रमेश फुके यांनी त्यांच्या काळात डॉ. श्रीकांत जिचकार यांचे निकटतम सहकारी म्हणून काम केले. परिणय फुके यांचा परिवार म्हणजे डॉ. जिचकार यांच्या कुटुंबाशी जवळीक असलेला परिवार आहे. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये एक मोठी फळी होती, जी डॉ. जिचकार यांच्या कार्याने झपाटलेली होती. समाजपरिवर्तनाचे काम करण्यासाठी प्रेरित झालेली उच्चशिक्षीतांचा त्यामध्ये समावेश होता, असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadanvis and Dr. Parinay Fuke
Parinay Fuke : आमदार परिणय फुके म्हणाले, त्या दिवसांत मी तेथील भयावह स्थिती बघितली…

त्यानंतरच्या पिढीमध्ये डॉ. परिणय फुके यांच्यासारखे नेतृत्व पुढे आले. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा होता. त्यांच्या ताफ्यातील एक वाहन त्यांना दिसले नाही. त्यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांना कळले की, त्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याच्या छातीमध्ये असह्य वेदना होत होत्या. तेव्हा डॉ. फुके यांनी स्वतः त्याला रुग्णालयात नेले, त्याच्यावर उपचार केले. त्याची प्रकृती ठीक होईपर्यंत ते रुग्णालयातच थांबले. त्यानंतर त्यांनी गोंदियाच्या खासगी रुग्णालयात त्याला हालविले व त्याच्या उपचाराचा पूर्ण खर्च स्वतः केला. अशा संवेदनशील मनाचे डॉ. परिणय फुके आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com