
Amravati crime news : राज्यातील ठकबाजीचा, गुन्हेगारीचा फटका आता भाजपच्या दिग्गज नेत्यांना बसत असल्याचे प्रकार समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेटरहेड आणि त्यावर सही त्यांची बनावट सही केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस देखील हे बनावट लेटरहेट पाहून चक्रावले आहे. कोणी, कसं आणि का केलं, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मंत्री बावनकुळे यांचे बनावट लेटरहेड तयार करून त्यावर बनावट सही करून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात दिलं. या पत्रात एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करावी, असं लिहिलं होते. त्यामुळे या लेटरहेडविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली.
अमरावतीमधील (Amravati) मोर्शीमधील एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्यासंदर्भातील हे पत्र जिल्हाधिकारी यांनी तपासल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात आले. लेटरहेडबरोबर त्यावरील मंत्री बावनकुळे यांची देखील बनावट असल्याचे निदर्शनास आले. यानंतर जिल्हा प्रशासनाने मंत्री बावनकुळे यांचे स्वीय सहायक योगेश कोठेकर यांना माहिती दिली.
स्वीय सहायक योगेश कोठेकर यांनी याची तत्काळ दखल घेत बनावट लेटरहेड आणि त्यावरील बनावट सहीवरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास देखील सुरू केला आहे.
स्वीय सहायक योगेश कोठेकर यांनी अमरावतीचे पोलिस आयुक्तांना पत्र देत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने खोटे लेटरहेड तयार करून त्यावर मंत्री महोदयांची खोटी सही करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे पत्र देत मागणी केली. या व्यक्तीला शोधून, त्यावर गुन्हा नोंदवून अटक करावी, असेही कोठेकर यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, नऊ महिन्यापूर्वी देखील मंत्री बावनकुळे यांचे बनावट लेटरहेड तयार करून त्यावर संभाव्य विधानपरिषदेचे उमेदवारांची नावे टाकली होती. हे लेटरहेड मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा बनावट लेटरहेड आणि त्यावर मंत्री बावनकुळे यांची बनावट सही केल्याचे देखील समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.