Eknath Shinde : CM शिंदेंकडे अजब डिमांड! लग्नासाठी कुणी मुलगी देईना, लाडकी बहीण योजना आणली, आता जमलं तर...'

Ladki Bahin Yojna And Farmers : बेरोजगारी आणि त्यातून तरुणांचे लग्न न होणे, अशी जटील समस्या अलिकडे डोके वर काढू लागली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News : स्त्रीभ्रूण हत्या, बदललेले हवामान, बेरोजगारी आदी काराणांमुळे राज्यातील सामाजिक स्तरावर मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मुलींची घटलेली संख्या वाढवण्यासाठी सराकरतर्फे अनेक चांगल्या योजना राबवल्या जात आहेत. तसेच महिलांचे आयुष्य सुकर करण्यासाठीही सरकार कायम प्रयत्नशील असते. लाडकी बहीण योजनाही त्याचाच एक भाग आहे.

हे करताना मात्र सरकार तरुणांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. बेरोजगारी आणि त्यातून तरुणांचे लग्न न होणे, अशी जटील समस्या अलिकडे डोके वर काढू लागली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून मोठी मागणी केली आहे.

जयपाल प्रकाश भांडारकर असे या युवा शेतकरी पुत्राचे नाव आहे. त्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याच्याकडे स्वतःची सहा एकर शेती आहे. या शेतीतून तो भातासह इतर पिके घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर जयपालने शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटाचे थोडक्यात वर्णन केले आहे.

या पत्रातून जयपाल याने शेतकर्‍यांच्या मुलांना लग्नासाठी कुणी मुलगी देण्यास तयार होत नाही, याकडे मुख्यमंत्री शिंदेंचे Eknath Shinde लक्ष वेधले. त्यामुळे जमले तर राज्यात एखादी लाडका भाऊ योजना राबवा. अशी एखादी योजना आणा की ज्यामुळे तरुणांसह शेतकऱ्यांचे मुलांना दिलासा मिळेल, असे आवाहनही जयपाल भांडरकार याने मुख्यमंत्री शिंदेंना केले आहे. यासाठी तो हातात फलक घेऊन गावाच्या चौकात उभा राहिला आहे. त्याच्या मागणीच्या फलकासह जयपालचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ladki Bahin Yojana
Ajit Pawar Baramati : बारामती राखण्यासाठी अजितदादांची मोठी तयारी; विधानसभेचं रणशिंग फुंकणार?

जयपालचं नेमकं काय म्हणणं?

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. मात्र, शेतकरी आणि त्यांच्या तरुण मुलांचे अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली देण्यास कुणीही तयार होत नाहीत, अशी खंत जयपाल याने व्यक्त केली. त्यामुळे राज्यात शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी अनोखी मागणी जयपाल याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ladki Bahin Yojana
Jayant Patil Defeat : कुणा फितुरांमुळे... शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी विधान परिषद दणाणून सोडणारा आवाज झाला 'म्यूट'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com