Winter Session 2022 : नगरमध्ये जबरदस्तीने धर्मांतर: राम सातपुतेंच्या लक्षवेधीने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धर्मांतर बंदी कायद्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.
Winter Session 2022 | Ram Satpute
Winter Session 2022 | Ram Satpute Sarkarnama
Published on
Updated on

Winter Session 2022 : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धर्मांतर बंदी कायद्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सत्ताधारी पक्षाकडून राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे. असे असतानाच आज पुन्हा भाजप (BJP) आमदार राम सातपुते यांनी नगर जिल्ह्यातील धर्मांतराबाबत लक्षवेधी उपस्थित केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या कमल सिंग आरोपीवर कारवाई होत नसल्याबाबत आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली. नगरच्या ब्राह्मणी गावात कमल सिंग नावाची ख्रिश्चन मिशनरी ने पोलीस निरीक्षक दराडेच्या मदतीने गावातील हिंदू, आदिवासी आणि दलितांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत आहे. या समाजकंटकांनी हिंदू लोकांवर दबाव टाकून आपल्या हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांची विटंबना केली. इतकेच नव्हे तर महिला भगिनींचा विनयभंग केला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या पोलीस निरीक्षक दराडे ला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी यावेळी राम सातपुते यांनी केली. त्यात वेळी त्यांनी महाराष्ट्रात धर्मांतर विरोध कायदा आणणार का, असे प्रश्न उपस्थित केला.

Winter Session 2022 | Ram Satpute
शिंदे फडणवीस सरकारचा 'क्लिनचिट'चा सिलसिला? शुक्लांपाठोपाठ भाजपच्या 'या' बडया नेत्यालाही क्लिनचिट

राम सातपुते म्हणाले की, पंजाबमधून आलेला कमल सिंग ब्राह्मणी गावातील हिंदू, आदिवासी, दलित लोकांना धर्मपरिवर्तन केल्यास दोन हजार रुपये देतो, असे सांगतो. गावाच्या पाणवठ्याजवळ हिंदू महिला, लोकांना बोलवले जाते. त्यांच्या घरातील देव देवांच्या मुर्त्या, फोटो फाडून टाकण्यास सांगितले जाते. तो महिलांना कुठेही स्पर्श करतो. या सर्व घटनाक्रमात पीआय दराडे कमल सिंग त्याला साथ देतो. नगर जिल्ह्यात या ख्रिश्चन मिशनरींकडून अनेक दलित वस्त्यामधील लोकांचे धर्मांतर केले जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत चर्च बांधले गेले असल्याचा आरोपही यावेळी राम सातपुते यांनी केला.

सातपुते यांच्या लक्षवेधीनंतर शंभुराज देसाई म्हणाले, हिराबाई हरे यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. सिंग याच्याविरोधात एप्रिल २०२२ मध्येच गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे होते. पण पण त्याला अटकपुर्व जामीनही मिळाला, गेल्या आठ महिन्यांपासून पोलीस त्याला शोधत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात दिरंगाई झाल्याचे सकृतदर्शनी सत्यता आढळून आली आहे. पण तो पर्यंत अधिकारी दराडे यांची येत्या पंधरा दिवसांत त्याची चौकशी करु आणि चौकशीत तो दोषी आढळता तर त्याच्यावर कठोर कारवाई करु, असे आश्वासन दिले आहेत. तसेच, तुर्तास पीआय दराडे यांची जिल्हा नियोजन कक्षात बदली करणार असल्याचं स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com