MLA Bacchu Kadu यांना नागपूरला हलवणार, डोक्याला चार टाके, पायही फ्रॅक्चर...

Amravti : एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्यासाठी जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

अमर घटारे

Bachu Kadu met with an accident today morning : चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा आज सकाळी ६ ते ६.३० वाजताच्या दरम्यान अपघात (accident) झाला आहे. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्यासाठी जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात (Hospital) त्यांना दाखल करण्यात आले आहे. येथून १० ते १५ मिनीटांत त्यांना नागपूरला हलविण्यात येणार आहे.

अमरावती (Amravati) शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात आज सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. बच्चू कडू (Bacchu Kadu) हे एका कार्यक्रमाला जाण्याकरिता अमरावतीत आले होते. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. दरम्यान भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच पायाला मार लागला आहे. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. बच्चू कडू यांच्यावर स्थानिक डॉक्टर उपचार करीत आहे. पण त्यामुळे त्यांना पाहिजे तसा आराम झालेला नाही. त्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून चार टाके लागले आहेत आणि पाय फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती रुग्णालयात उपस्थित लोकांनी दिली.

Bacchu Kadu
Bachchu Kadu : 'मूर्ख आहोत का आम्ही', बच्चू कडू सरकारवर संतापले

बच्चू कडू यांचे मित्र रवींद्र वैद्य यांच्यासोबत एका खासगी कार्यक्रमात जाण्यासाठी बच्चू कडू अमरावतीमध्ये आले होते. आपल्या गाडीतून उतरून मित्राच्या गाडीत बसायला जात असताना डिव्हायडर ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यामध्ये ते डिव्हायडरवर जाऊन पडले आणि जखमी झाले. त्यांच्यावर नागपूरच्या न्यूराॅन हाॅस्पीटलमध्ये पुढील उपचार होणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com