Ad. Satish Ukey: भूखंड हडपल्याप्रकरणी ऊके बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी...

ॲड. सतीश उके आणि प्रदीप उके ‘मनी लॉड्रिंग’च्या गुन्ह्यात दोघांनाही अटक करण्यात आली होती. यांना काल जिल्हा व सत्र न्यायालयासमोर (District Court) सादर केले.
Ad. Satish Ukey
Ad. Satish UkeySarkarnama
Published on
Updated on

नागपूर : बोखारा परिसरातील साडेपाच एकर भूखंड बनावट कागदपत्रांद्वारे हडपल्याप्रकरणी गुन्हे शाखेने (Crime Branch) प्रोडक्शन वॉरन्टवर अटक केलेल्या ॲड. सतीश उके (Ad. Satish Ukey) आणि प्रदीप उके यांना काल जिल्हा व सत्र न्यायालयासमोर (District Court) सादर केले. यावेळी दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

अजनी पोलिसांनी (Police) याच वर्षी जानेवारी महिन्यात ५२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून उके बंधूंवर फसवणूक, अत्याचाराचा प्रयत्न, बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात सतीश आणि प्रदीपला न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला होता. दरम्यान उके बंधूंनी गैरकायदेशीररित्या पैशांचा व्यवहार केल्याची माहिती मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) )ED) तपासाला सुरुवात केली. त्यातून ‘मनी लॉड्रिंग’च्या गुन्ह्यात दोघांनाही अटक करण्यात आली होती. ईडीची कोठडी संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडीमध्ये तुरुंगात पाठविण्यात आले होते.

दरम्यान भूखंड प्रकरणात जामिनाचा कालावधी संपल्यानंतर अजनी ठाण्यात नोंद प्रकरणात गुन्हे शाखेने मुंबईच्या न्यायालयातून प्रोडक्शन वॉरंट घेत दोघांनाही अटक केली. बुधवारी दोघांनाही नागपूरला आणून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने पीडित महिलेच्या पतीशी भूखंडाचा करारनामा करताना दोन साक्षीदारांनी सही केली केल्याची बाब समोर केली. याशिवाय कागदपत्रांवर केवळ त्यांची सहीच आहे. नाव, पत्ता काही नाही. सही करणाऱ्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रदीपने महिलेला पिस्तूल दाखवून धमकावल्याचेही सांगितले. तसेच, त्या पिस्तुलाबाबत विचारपूस करायची आहे.

Ad. Satish Ukey
भाजप नेत्यांच्या विरोधात बोलल्यामुळेच झाली कारवाई, उके कुटुंबीयांचा आरोप…

वर्ष २००८ मध्ये उके ४-५ लोकांना सोबत घेऊन महिलेला धमकावण्यासाठी गेले होते. त्यांचा शोध घेण्यासह विविध मुद्द्यांवर या सर्व बाबींच्या तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. दरम्यान सतीश उके यांनी स्वत: न्यायालयात आपली बाजू मांडली. तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने उके बंधूंची कारागृहात रवानगी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com