Gadchiroli Crime News : गडचिरोलीत ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची हत्या !

Gadchiroli Police : राहत यांचे पती तायमीन शेख यांनी ही हत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
Gadchiroli Crime News : गडचिरोलीत ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची हत्या !

Gadchiroli District Kurkheda Crime News : जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात त्यावेळी मोठी खळबळ उडाली, ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील युवती सेनेच्या शहर प्रमुखाच्या हत्येची वार्ता गडचिरोलीत वाऱ्यासारखी पसरली. जिल्ह्यातील कुरखेडा येथे हा प्रकार घडला. मरण पावलेल्या शहर प्रमुखाचे नाव राहत सय्यद आहे. (The police clarified that Rahat's husband Taimeen Sheikh committed the murder)

चाकूने भोसकून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ज्यावेळी राहत यांचे वडील अज्जू सय्यद झोपेतून जागे झाले, त्यावेळी त्यांना राहत या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी हा प्रकार आपल्या नातेवाइकांना व पोलिसांना कळविला.

राहत यांचे पती तायमीन शेख यांनी ही हत्या केल्याचे पोलिसांनी (Police) स्पष्ट केले. राहत यांची हत्या केल्यानंतर तायमीन शेख हे गावातील नदीवर गेले. तेथे त्यांनी आंघोळ केली. रक्ताने माखलेले कपडेही धुतले. नदीवरून तायमीन यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले व आपणच राहत यांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली.

राहत यांचा पती तायमीन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे हरणाच्या शिंग विक्री प्रकरणात अटक झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी तायमीन जामिनावर सुटून आला होता. विवाहापूर्वी तायमीन मुंबईतील (Mumbai) फुटपाथवर विविध साहित्य विक्रीचे काम करायचा. राहत यांच्याशी विवाह झाल्यानंतर दोघेही माहेरीच वास्तव्यास होते.

अशात अचानक राहत यांची हत्या झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. राहत सय्यद यांचे वडील अज्जू सय्यद हे शिवसेनेचे (Shivsena) निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पत्नी, दोन मुलं, राहत आणि त्यांचा पती तायमीन यांच्यासह ते कुरखेड्यात वास्तव्यास आहेत.

Edited By : Atul Mehere

Gadchiroli Crime News : गडचिरोलीत ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची हत्या !
Gadchiroli News | Nana Patole यांचा मोठा दावा; BJPमध्ये हिंमत नाही, आम्ही ते करुन दाखवतो |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com