Gadchiroli District News : ‘मार्कंडेश्‍वर’साठी खासदार नेते व आमदार होळींची दिल्लीवारी; पण वेगवेगळी...

MP Ashok Nete : खासदार अशोक नेते यांच्या पाठोपाठ आमदार डॉ. देवराव होळी यांनीही दिल्ली गाठली.
MP Ashok Nete at Delhi.
MP Ashok Nete at Delhi.Sarkarnama
Published on
Updated on

The restoration work was stalled for the past several years : विदर्भाची काशी, अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. हे काम पूर्ण व्हावे, यासाठी खासदार अशोक नेते यांच्या पाठोपाठ आमदार डॉ. देवराव होळी यांनीही दिल्ली गाठत पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा केला. (Dr. Deorao Holi also reached Delhi and followed up with the Archeology Department)

विशेष म्हणजे एकाच पक्षाचे खासदार, आमदार असलेले हे दोन्ही लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या वेळेस या विभागात गेल्यामुळे जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. खासदार अशोक नेते यांनी या भेटीबद्दल सांगितले की, मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी आपण दिल्ली येथे बैठक घेतली. मार्कंडा देवस्थानाच्या बांधकामाच्या निविदांसंदर्भात काही अडचणी येत होत्या, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या व इतर अडचणी दूर करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत होतो.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनासुद्धा बैठकीदरम्यान देवस्थानाच्या समस्या लक्षात आणून दिल्या. त्यानंतर आपल्या पुढाकाराने भारतीय पुरातत्त्व विभागाचे महानिदेशक के. के. बासा, अतिरिक्त महानिदेशक जानविश शर्मा, डॉ. अलोक त्रिपाठी, संचालक सुंदर पाल, अधीक्षक अभियंता एस. के. कन्ना यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक पार पडली. या मंदिर बांधकाम निविदा प्रक्रियेबाबत अडचण दूर झाली आहे.

मार्कंडा देवस्थानाच्या कामासाठी दोन मटेरियल आणि मॅन पॉवर टेंडर प्रोसेसिंग पूर्ण झाली आहे. मार्कंडा देवस्थानाचे बांधकाम लवकरात लवकर मार्गी लावून मंदिर बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व समस्या दूर कराव्या, असे निर्देश या बैठकीत दिल्याचे खासदार अशोक नेते यांनी म्हटले आहे. दरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनीही आपल्या दिल्लीवारीची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

MP Ashok Nete at Delhi.
Gadchiroli Loksabha : काॅंग्रेसने जिद्द सोडली नाही तर भाजप, अन् तेही नाही तर बीआरएस; पण धर्मरावबाबा लढणारच !

येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मार्कंडा देवस्थानाचे काम सुरू होणार असल्याचे डॉ. होळी यांनी म्हटले आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर देवस्थानाचे बांधकाम काही वर्षांपासून प्रलंबित असून ते तातडीने सुरू व्हावे, याकरिता आपण दिल्ली (Delhi) येथे पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या भेटीतील चर्चेत येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे ते म्हणाले.

विशेष म्हणजे आमदार डॉ. देवराव होळी यांनीही भारतीय पुरातत्त्व विभागाचे महानिदेशक के. के. बासा, अतिरिक्त महानिदेशक जानविश शर्मा, डॉ आलोक त्रिपाठी , संचालक सुंदर पॉल आणि अधीक्षक अभियंता एस. के. कन्ना यांचीच भेट घेतल्याचे म्हटले आहे.

MP Ashok Nete at Delhi.
Gadchiroli District News : पंजा घड्याळाचा काटा काढणार, की काटा पंजात घुसून त्याला घायाळ करणार?

सव्वादोन कोटी रुपयांची निविदा...

मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामासंदर्भातील मटेरियल साहित्याची निविदा प्रक्रिया झाली असून लेबर टेंडर प्रक्रियादेखील सुरू आहे . जवळपास सव्वादोन कोटी रुपयांच्या या निविदा असून त्यानुसार मंदिराच्या देवस्थानाच्या विकासाचे काम येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, असे आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी म्हटले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com