Ajit Pawar : 'मस्तीच उतरवतो'; अजित पवारांचा धान घोटाळ्यावर अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra Deputy CM Ajit Pawar alleged paddy scam government warehouse Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील सरकारी गोदामातील धान घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत.
Ajit Pawar 1
Ajit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Government warehouse fraud : गडचिरोली जिल्ह्यातील सरकारी गोदामातील धानाची परस्पर विक्री केल्या प्रकरणी संबंधित राईस मिल मालक आणि सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे इशारा उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांनी दिला.

गडचिरोलीतील या धान घोटाळ्यावर काँग्रेस आमदार नाना पटोले आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

अजित पवार (Ajit Pawar) या लक्षवेधीवर चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात आठ दिवसांत सविस्तर माहिती घेतो. जे अधिकार यात असतील, निगरगठ्ठ झाले असतील, ज्यांना जास्त मस्ती आली असेल, त्यांची मस्ती उतरवतो, असा इशारा दिला.

Ajit Pawar 1
BJP News : मोठी बातमी: फडणवीस आपला शब्द पाळणार, विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भाजपनं 'ही' तीन नावं केली फायनल..?

गडचिरोली जिल्ह्यात काही राईस मिलर्सच्या माध्यमातून धानापासून तयार केलेल्या तांदळाच्या व्यवहारात काळाबाजार होत असल्याच्या घटना घडत आहेत. सरकारी धान खरेदी केंद्रावरील खरेदी केलेला धान स्थानिक राईस मिलर्सला भरडाईकरिता देण्यात येतो आणि तयार केलेला तांदूळ सरकारी डेपोमध्ये जमा करावा लागतो. मात्र, अनेकदा सरकारी गोदामातून उचल केलेल्या धानाची परस्पर विक्री करून नफा कमावला जातो, असा आरोप नाना पटोले (Nana Patole) आणि सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी मांडताना केला.

Ajit Pawar 1
Prashant Kortkar case : प्रशांत कोरटकर 'चतूर', मोबाईलमधील डेटासंदर्भात पोलिसांनी न्यायालयात दिली धक्कादायक माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, योग्य चौकशी केला जाईल, यात दोषी असणाऱ्यांविरोधात निर्णय घेतला जाईल. धान खरेदी प्रक्रियेत दुरुस्ती केली जाईल. या प्रकरणात जे सहभागी असतील त्यांना सूतासारखे सरळ केले जाईल. मी स्वतः बैठक घेऊन आठ दिवसांत सगळी माहिती मागवून घेतो.

यानंतर जी बैठक बोलावली जाईल, तिला नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवार यांनाही बोलवले जाईल. यात जेवढी पारदर्शकता आणता, येईल तेवढी आणली जाईल, असे सांगताना यात कोणालाही सोडणार नाही, मग तो पुढारी कोणत्याही पक्षाचा, गटाचा असो, अशा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com