Nitin Gadkari, Prashant Damle and Chandrashekhar Bawankule
Nitin Gadkari, Prashant Damle and Chandrashekhar BawankuleSarkarnama

Gadkari On Bawankule : गडकरी म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे आता तुमची फजिती होणार !

Nitin Gadkari : मी अशा आघाड्या खूप करून पाहिल्या. त्याचा फायदा झाला नाही.
Published on

Nagpur Political News : सद्यःस्थितीत जातीच्या आधारावर राजकारण केले जाते. या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, याआधी मीसुद्धा खूप आघाड्या केल्या, जातीनिहाय केल्या, व्यापाऱ्यांच्या वेगळ्या आघाड्या केल्या; पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. (I have tried many such fronts. It didn't help)

आता आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मला म्हणाले की, आपण वेगवेगळ्या आघाड्या करू. त्यामध्ये जातीनिहाय वेगळ्या, व्यापाऱ्यांच्या वेगळ्या. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी अशा आघाड्या खूप करून पाहिल्या. त्याचा फायदा झाला नाही. माझी मात्र चांगलीच फजिती झाली. आता बावनकुळे तुमचीही फजिती होणार, असे नितीन गडकरी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

झोकून देऊन काम करतो म्हणून...

'सकाळ' वृत्तपत्र समूहाकडून आज ‘मनातले गडकरी’ हा कार्यक्रम आज (ता. २१) नागपुरातील डाॅ. वसंतराव देशपांडे सभागृहात घेण्यात आला. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नितीन गडकरींची मुलाखत घेतली. त्यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात गडकरी बोलत होते. या वेळी गडकरींनी सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रश्नांनाही अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

जातिवादक राजकारणावर बोलताना गडकरी म्हणाले, 'जो करेगा जात की बात, उसको पडेगी लात.' आपण स्वतःशी प्रामाणिक असलो पाहिजे, हे सांगताना त्यांनी एक आठवण सांगितली. औरंगजेबाच्या भूमिकेत प्रभाकर पणशीकर काम करायचे. प्रयोग झाल्यावर ते थकून जायचे. त्यावर विचारले असता, ते म्हणायचे की, मी माझ्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. झोकून देऊन काम करतो म्हणून थकतो.

अशाच प्रकारे ओनरशीप प्रत्येकामध्ये असली पाहिजे. ७० - ८० च्या दशकातील राजकारणाची पद्धत आजची राजकारणाची पद्धत, यामध्ये काय फरक आहे, असे प्रशांत दामले यांनी विचारले असता, गडकरी म्हणाले, १९७५ मध्ये मी अकरावीत होतो. जयप्रकाश नारायणांचे एक आंदोलन सुरू होते. तेव्हा आणीबाणी लागलेली होती. सायक्लोस्टाईल मशीनवर टेन्सील कर करून पत्रकं काढायचो. १९७७ मध्ये प्रत्यक्ष प्रचारात आलो. तेव्हाच्या आणि आजच्या राजकारणात प्रचंड तफावत आहे.

आज मतभिन्नता ही समस्या नाही तर मतशून्यता ही मोठी समस्या आपल्या देशात आहे. दत्तोपंत ठेंगडी संघात होते. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण करतो. परवा परवा वाघा सीमेवर ३१८ फुटांचा तिरंगा फडकवला. त्यावेळी इतका आनंद झाला की, डोळ्यांत पाणी आले, असे नितीन गडकरींनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Nitin Gadkari, Prashant Damle and Chandrashekhar Bawankule
नितीन गडकरींनी सांगितलं त्यांचं आनंदी राहण्याचं सिक्रेट | Nitin Gadkari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com