Protest in Akola : उपासामुळं पोटाला पीळ पडण्यापलीकडील वेदना का होईना, पण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत अन्नपाणी घेणार नाही असा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातील मराठा समाजाकडुन व्यापक पाठिंबा मिळत आहे. ठिकठिकाणी मंत्री, खासदार, आमदार, राजकीय पुढारी यांना गावबंदी करण्यात येत आहे. त्यांच्या वाहनांचा ताफा अडविण्यात येत आहे. पुढाऱ्यांनी घराबाहेर पडावं की नाही असा विचार त्यांना करायला लावणारी परिस्थिती राज्यात निर्माण होतेय. अशात अकोल्यातील एका व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलय.
मराठा आरक्षण मिळावे यासाठी अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मंत्र्यांना अकोल्यात जिल्हाबंदी तर पुढाऱ्यांना गावबंदी केली जात आहे. अशात मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्या समर्थनार्थ अकोल्याच्या गजानन हरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं अन्नत्याग आंदोलन सुरू करीत आरक्षणाची मागणी रेटुन धरलीय. मराठा कार्यकर्त्यानं आंदोलन सुरू करताच रविवार (ता. २९) सुटीचा दिवस असतानाही प्रशासन हादरलं व त्यांनी ही माहिती वरपर्यंत कळवली की आमच्याही जिल्ह्यात आंदोलनाची ठिगणी पडलीय. (Gajanan Harne's food sacrifice movement from Akola in support of Manoj Jarange Patil and for Maratha reservation in Maharashtra)
हरणे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू करताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसराजवळ असलेल्या त्यांच्या उपोषण मंडपाला मराठा समाजाील विविध सामाजिक कार्यकर्ते व संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट देण्यास सुरुवात केली. मात्र विरोध होण्याची शक्यता बघता एकही पुढारी कोणत्याही पक्षाची छापी गळ्यात घालुन चुकुनही या भागाकडे फिरकलाही नाही. संपूर्ण समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि समाजाची मागणी म्हणुन आपण हे अन्नत्याग आंदोलन करीत असल्याचं गजानन हरणे यांनी स्पष्ट केलं. कदाचित हरणे यांचा पुढाकार पाहता अकोला जिल्ह्यातील आणखी काही मराठा समाज बांधव अशाच प्रकारचं किंवा याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग व राजकीय पुढारी सारेच सतर्क झाले आहेत.
कोण आहेत गजानन हरणे?
गजानन हरणे यांनी यापूर्वीही अकोल्यात विविध मुद्द्यांवर आंदोलनं केली आहेत. अनेक उपोषणांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणुन अकोला लोकसभेची निवडणूक लढविली होती. सध्या ते आम आदमी पार्टीचं काम करीत आहेत. परंतु त्यांनी ओळख राजकीयपेक्षा सामाजिक कार्यकर्ता म्हणुन अधिक आहे.
(Edited by : Prasannaa Jakate)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.