Girish Mahajan : गिरीष महाजन गोल गोल काय दळण दळतात, कळतच नाही !

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी सरकारवर तोफ डागली.
Dr. Manisha Kayande and Girish Mahajan
Dr. Manisha Kayande and Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Legislative Council News : घरकुलासाठी एका आदिवासी लाभार्थ्याला उपोषण करावे लागते आणि त्यात त्याचा मृत्यू होतो, ही राज्यकर्त्यांसाठी शरमेची गोष्ट आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर तोफ डागली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला. (Eknath Khadse fired a cannon at the government)

एकनाथ खडसे म्हणाले, एक आदिवासी उपोषणकर्ता मरतो, ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. योजनेचे निकष बदलवण्याची गरज आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे दर वाढले. पण घरकुलाच्या किमती पूर्वीच्याच आहेत आणि म्हणून बव्हंशी ठिकाणी घरकुलांचे काम अर्धवट राहिले. किमतीमध्ये वाढ करण्याबाबत सरकारची भूमिका काय, हे मंत्र्यांनी तातडीने स्पष्ट केले पाहिजे.

यावर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले, बिडला आप्पाराव पवार या उपोषणकर्त्याचा मृत्यू झाला, हे खरे आहे. शबरी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण घरकुल मंजूर झाले होते. त्यासाठी जागाही दिली होती. पण नंतर लक्षात आले की तीज जागा बीडच्या पोलिस अधीक्षकांना दिली आहे. त्यामुळे अडचण निर्माण झाली. आप्पाराव आणि त्यांच्या कुटुंबातील चार लोक उपोषणाला बसले होते.

त्याची दखल घेत नवीन पर्यायाचा शोध सुरू झाला. इतर जागा त्यांना दाखवल्या. पण पवार कुटुंब नाही म्हणाले. ती जागा गायरानची होती. ती त्यांना मिळू शकत नव्हती. ते २ डिसेंबर २०२२ ला उपोषणाला बसले. आप्पाराव पवारचे वय ६० वर्ष होते. प्रकृती खराब होती. ४ डिसेंबर २०२२ ला त्यांचं निधन झालं. त्यानंतर शहाजनपूर येथे शासनाने जागा पाच लाख रुपयांना विकत घेतली.

Dr. Manisha Kayande and Girish Mahajan
Manisha Kayande : 'तुम्ही केलं तर रासलीला; अन् आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला', असं का ?

त्या जागेवर १८ घरकुल बांधायचे ठरले. हेसुद्धा पवार कुटुंबीयांना पटले नाही. नंतर त्यांचे नातेवाईक न्यायालयात गेले आणि कामावर स्थगिती आली. म्हणून हे प्रकरण थांबले आहे. तुकडा पद्धती बंद झाली. त्यामुळे जागांच्या खरेदीमध्ये अडचणी येत आहेत. जागेसाठी सरकारने जे ५० हजार रुपये देऊ केले, ते आता वाढवून देत आहोत. ओबीसींसाठी १० लाख घरे घरकुल देणार आहोत, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.

गिरीष महाजनांच्या (Girish Mahajan) उत्तरावर डॉ. मनीषा कायंदे (Manisha Kayande) भडकल्या. आप्पाराव पवार आजारी असल्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत का? असा सवाल करत गिरीष महाजन गोल गोल दळण दळत आहेत. विषयच ते फिरवत आहेत. ते काय बोलतात हे कळत नाहीये, असे म्हणत भूमिहीन लोकांसाठी काय तरतूद करणार, असा सवाल त्यांनी केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याविषयी सरकारचा निषेध केला. पोलिसात (Police) गुन्हा दाखल झाला आहे. तरीही सरकार कारवाई करत नाही. पवार कुटुंबीयांना जागा मिळाली नाही की मिळू दिली नाही, हेसुद्धा सरकारने (State Government) स्पष्ट करावे, असे दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com