गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील देवरी नगरपंचायतीचे निकाल हाती आले असून येथे १७ जागांसाठी निवडणूक झाली होती. यांपैकी भारतीय जनता पक्षाने (BJP) ११ जागांवर विजय मिळवित ही नगर पंचायत कब्जात घेतली आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे प्राबल्य राहिलेले आहे. येथे भाजपने शिस्तबद्ध प्रचार करीत देवरी नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. येथून जवळच असलेल्या मोरगाव अर्जूनी नगरपंचायतीमध्ये भाजपने चांगली कामगिरी केलेली असली तरी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि मित्रपक्षांचे सहकारी सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती आहे. सडक अर्जुनी नगरपंचायतमीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
देवरी आणि मोरगाव अर्जुनीचे निकाल खालीलप्रमाणे...
देवरी नगर पंचायत एकूण 17 जागा
भाजप – 11
शिवसेना – 0
राष्ट्रवादी –02
काँग्रेस –04
मोरगाव अर्जुनी नगर पंचायत 17 जागा
भाजप – 07
शिवसेना –01
राष्ट्रवादी –04
काँग्रेस –04
इतर –01
सडक अर्जुनी नगर पंचायत 17 जागा
भाजप – 01
शिवसेना –01
राष्ट्रवादी –07
काँग्रेस –02
बाहुबली पेनल- 03
इतर –03
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.