Gondia BRS News : भाजपची ‘बी’ टीम संबोधताच भडकले बीआरएसचे नेते चरण वाघमारे!

KCR : के. चद्रशेखर राव यांच्या गळाला माजी आमदार चरण वाघमारे सहज लागले.
Charan Waghmare, BRS
Charan Waghmare, BRSSarkarnama

Gondia and Bhandara Political News : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचे विभागीय समन्वयक, माजी आमदार चरण वाघमारे काल (ता. सहा) चांगलेच संतापले. बीआरएस ही भाजपची बी टीम आहे, असे म्हणताच त्यांचा राग अनावर झाला. बीआरएसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना भाजपमधून निष्कासीत करण्यात आले होते, हे त्यामागचे एक कारण सांगितले जात आहे. (K. Chadrasekhar Rao found former MLA Charan Waghmare easily)

काल (ता. सहा) गोंदिया येथे बीआरएसच्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी याबाबत खुलासा केला. चरण वाघमारे यांच्या बीआरएसचा संबंध पुन्हा भाजपशी जोडल्याने त्यांनी पत्रकारांसमोर उघड नाराजी व्यक्त केली. बीआरएसचे महाराष्ट्रात आगमन होताच के. चद्रशेखर राव यांच्या गळाला माजी आमदार चरण वाघमारे सहज लागले. वाघमारे यांचा जनसंपर्क लक्षात घेता थेट त्यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली.

सहा जिल्ह्यांचे प्रभारीपद चरण वाघमारे यांच्याकडे देण्यात आले आहे. वाघमारे सद्यःस्थितीत पूर्व विदर्भात (Vidarbha) गुलाबी वादळ पसरवत आहेत. या दरम्यान काल गोंदिया (Gondia) जिल्ह्यात पक्ष बांधणीच्या कार्यक्रमादरम्यान ते गोंदियात आले होते. कार्यकर्ता मेळावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना बीआरएस पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोपाबाबत विचारले असता, त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

पूर्वाश्रमीचे भाजप (BJP) नेते राहिलेले चरण वाघमारे यांच्या मनात भाजपबद्दल किती खदखद आहे, हे काल दिसून आले. आपला ‘इंडिया’ या आघाडीसोबतही काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोंदिया जिल्ह्यात बीआरएसची २० हजार ऑनलाइन सदस्य नोंदणी झाली असल्याची माहिती दिली. केसीआर यांच्या विकासाच्या मॉडेलमुळे बीआरएस पूर्व विदर्भात आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Charan Waghmare, BRS
Gondia-Bhandara News : ...तरच मी भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढवणार !

भाजप वगळता इतर कोणत्या पक्षासोबत बीआरएसची युती होणार का, असे विचारले असता, आपली महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाशी युती झाली नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा बीआरएस स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला बीआरएसमध्ये संधी आहे. सामान्य कार्यकर्त्यांची कामे बघून त्यांनी आगामी निवडणुकीची उमेदवारी देणार असल्याचेही ते म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com