Gondia Hawkers Zone : मतांच्या राजकारणात अडकले गोंदियाचे 'हॉकर्स झोन'

Political Interference : राजकीय हस्तक्षेपाने बाजार उठविण्यास झाला विरोध !
Gondia
GondiaSarkarnama
Published on
Updated on

Gondia Hawkers Zone : मतांचे राजकारण बिघडू नये, म्हणून समस्येला समस्या राहू देण्यात गोंदियातिल नेते धन्यता मानत आहेत. जागा मिळूनसुद्धा आपले मतदार नाराज होऊ नये, म्हणून बाजार उठविण्यास विलंब लावण्यात येत आहे.

गोंदिया शहरात मिळेल त्या ठिकाणी टपऱ्या आणि इतर दुकाने थाटून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यावर उपाययोजना म्हणून गोंदिया शहरातील दुकानांचे सर्वेक्षण करून त्यांना स्थायी स्वरुपात दुकाने देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वेक्षणासाठी शासनाने नगरपालिकेला 1 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर केला.

Gondia
Gondia OBC News : ओबीसीच्या जनगणनेसाठी जिल्ह्यात पोहोचली यात्रा !

शासनाच्या या योजनेंतर्गत फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यात येणार असून उपाययोजना सुरू केल्या आहेत. ऑनलाइन सर्वेक्षणही करण्यात आले. सर्वेक्षणाचे काम एका संस्थेला देण्यात आले. सर्वेक्षणाच्या आधारे फेरीवाल्यांची यादी तयार केली जाणार आहे. या यादीत ज्या फेरीवाल्यांचा समावेश असेल, त्यांना हॉकर्स झोनमध्ये दुकान उपलब्ध करून दिले जाणार होते. हे काम अधिक प्रभावीपणे व्हावे, या उद्देशाने अस्थायी कमिटीची स्थापना करण्यात आली.

या कमिटीत शहरातील विविध भागांतील नागरिकांना प्रतिनिधित्व देण्यात आले. हॉकर्स झोनसाठी दुकाने देण्यात येणार असून त्यासाठी फेरीवाल्यांना रक्कम जमा करावी लागणार आहे. यासाठी नगरपालिकेसमोर पालिकेच्या मालकीची चार एकर जागा आहे. त्याठिकाणी सध्या बाजार भरतो. या जागेवरील विक्रेत्यांना हटवून त्याठिकाणी चार मजली हॉकर्स झोन तयार करण्यात येणार आहे. त्या हॉकर्स झोनमध्ये दुकाने हवी असलेल्यांकडून रक्कम घेण्यात येणार आहे.

दरम्यान फेरीवाले शहरातील गल्लीबोळात जाऊन साहित्याची विक्री करतात. मात्र त्यांना आता एकाच ठिकाणी स्थायी दुकान थाटून साहित्य विक्री करावी लागणार आहे. अत्यंत चांगला प्रकल्प असतानाही या प्रकल्पाची गती मंदावली. शहरातील बाजारातील दुकान गाळे जीर्ण झाले. गल्ल्यादेखील अगदी अरुंद आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजी बाजारातील दुकानदार दुकानातील कचरा रस्त्यावर फेकतात. त्यामुळे बाजारात नाकावर रुमाल ठेवूनच जावे लागते. त्यासाठी बाजाराचे स्थलांतर अथवा फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन होणे गरजेचे असताना राजकीय मंडळीच आपली मते बिघडू नयेत, यासाठी प्रकल्पाला विलंब करीत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com