The attention of the regional leadership was drawn through strikes : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्याविरोधात कॉंग्रेसमधल्या एका गटाने वज्रमूठ बांधली. साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रदेश नेतृत्वाचे लक्ष वेधले. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे हे काल-परवाच उपोषणस्थळी येऊन गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर गावंडे यांनी जिल्हाध्यक्षांसह उपाध्यक्षांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. (A solid promise has been made to take action against the district president along with the vice president)
त्यामुळे जिल्हाध्यक्षांसह उपाध्यक्षांचीही लवकरच हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये तिरोडा विधानसभा क्षेत्रातून तिकीट न मिळाल्याने दिलीप बन्सोड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून कॉंग्रेसचा हात धरला. माजी आमदार आणि अनुभवाच्या जोरावर प्रदेश नेतृत्वाने त्यांना आल्याआल्या जिल्हाध्यक्षपद दिले. पद मिळताच त्यांनी एकाधिकारशाहीपणाचे धोरण अवलंबिले.
कार्यकर्त्यांची कुठलीही बाजू ऐकून न घेता परस्पर निर्णय घेणे, बैठका न घेणे हा त्यांचा स्वभाव बनला. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता. हा असंतोष काही दिवसांपूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आला. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत तडजोड करू नये, अशा प्रदेश कॉंग्रेसच्या स्पष्ट सूचना असताना जिल्हाध्यक्ष बन्सोड आणि उपाध्यक्ष गुप्ता यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली.
सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला दूर सारले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांना पदावरून हटवावे, अशी मागणी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली. गोंदिया जिल्हा कॉंग्रेस बचाओ समितीची स्थापना करत शहीद भोला भवनात १ जूनपासून साखळी उपोषण सुरू केले. उपोषणाची दखल न घेतल्यास राजीनाम्याची तयारीदेखील दर्शविली गेली आहे. तसा निरोप प्रदेश नेतृत्वाला धाडला.
४ जून रोजी रात्री प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. लवकरच ठोस कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावरून कार्यकर्त्यांनी तूर्तास उपोषण मागे घेतले. जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरून हटलेच पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. अन्यथा १५ जूननंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
गोंदिया (Gondia) जिल्ह्यात कॉंग्रेसला (Congress)वाचविण्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांना बदलणे गरजेचे झाले आहे. लहान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर पक्ष नेतृत्वाने दखल घेतली पाहिजे, असे प्रदेश सचिव अमर वराडे यांनी म्हटले आहे. उद्या (ता. ८) रोजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) जिल्ह्यात आहेत. यावेळी नवेगावबांध येथे ते कार्यकर्त्यांशी या विषयावर चर्चा करणार आहेत. कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर पुढील निर्णय होणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.