Nana Patole News: पदवीधर आणि शिक्षकांनी भाजपचा डाव ओळखला, आम्ही पाचही जागा जिंकू !

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या सर्व पाचही जागा निवडून येणार आहेत.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Graduate and Faculty Constituency Elections : भाजप दबावतंत्राचा वापर करत आहे. हे आम्ही आधीच म्हणालो होतो. आता लोक समजदार झाले आहेत. भाजप नेते निवडणुकांमध्ये जे काही करत आहे, त्याची भरपाई त्यांना करावी लागेल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज म्हणाले.

भंडारा (Bhandara) येथे नाना पटोले (Nana Patole) पत्रकारांशी बोल होते. महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले, आज दुपारी ३ वाजता संपूर्ण चित्र कळेल. पदवीधर आणि शिक्षक मतदारांना भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा डाव ओळखला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या सर्व पाचही जागा निवडून येणार आहेत. सुधीर तांबे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याने निलंबन करण्यात आले आहे. तसे पत्रही पक्षाकडून काढण्यात आहे.

‘माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे.’, असे ट्विट डॉ. सुधीर तांबे यांनी केले. त्याबाबत विचारले असता, सुधीर तांबे यांनी काय ट्वीट केले, यावर मी बोलणार नाही. ही कारवाई हायकंमाडकडून झाली आहे. त्यामुळे मी यावर बोलणे सयुक्तिक होणार नाही. यापुढेही त्यांच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा झाल्यास, हो विषय हायकमांड हाताळणार आहे.

न्याय व्यवस्था स्वतंत्र असून यात कुणीही हस्तक्षेप करू नये. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे न्यायाधीशांच्या नियुक्तीत हस्तक्षेप करत आहे. हे कृत्य संविधानासाठी धोकादायक आहे. जेव्हा जेव्हा न्यायव्यवस्था जनतेच्या प्रश्नाबाबत न्याय देण्याचे काम करते, तेव्हा या प्रक्रियेत भाजप हस्तक्षेप करते. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर जनतेच्या विश्वास राहिला नाही. आपल्या मर्जीतील लोकांना न्यायाधीश म्हणून दिली जात आहे. या पद्धतीने सांविधानिक धोका निर्माण झाला असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Patole on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांची आम्हाला चिंता वाटते : नाना पटोले असं का म्हणाले?

आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून लढत आहो. त्यामुळे नाशिक आणि नागपूर जागा अदलाबदलीचा प्रश्नच येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढून राज्यातील पाचही जागा जिंकू. भाजपची घर फोडण्याची प्रवृत्ती आहे. त्यांची ही प्रवृत्ती जनतेसमोर नेऊन चांगला धडा शिकवू, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com