Gondia News : नवेगांवबांध ग्रामपंचायतीने पुकारला ग्रामविस्तार अधिकाऱ्याविरोधात एल्गार

Gram Panchayat : ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाला केराची टोपली दाखविल्याने होतोय विरोध
Gram Panchayat Navegaon Bandh in Gondia.
Gram Panchayat Navegaon Bandh in Gondia.Google
Published on
Updated on

Navegaon Bandh : कार्यालयातील अनागोंदी कारभारमुळे गोंदिया जिल्ह्यात नवेगांवबांध ग्रामपंचायत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविस्तार अधिकारी यांच्यातील वादाने गावाचा विकास खुंटाला आहे. त्यामुळे ग्रामविस्तार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करीत संपूर्ण ग्रामपंचायतीने आता एल्गार पुकारलाय.

ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा 23 ऑगस्ट 203 रोजी घेण्यात आली. या सभेचे चित्रिकरण करण्यात आले. सभेत 376 गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता. ग्रामसभेच्या विषय सुचीनूसार 31 मे 203 रोजीच्या सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्याच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. त्यात तहकूब ग्रामसभा ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाला अनुसरून नसल्याच्या अहवालाचे वाचन करण्यात आले. खंडविकास अधिकाऱ्यांना हा चौकशी अहवाल दिला होता.

Gram Panchayat Navegaon Bandh in Gondia.
Gondia : भास्कर जाधव आले आणि आघाडीत बिघाडी लावून गेले

अहवालावर चर्चा करीत ग्रामस्थांनी एकमतानं ग्रामसभा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाला अनुसरून नसल्याने त्या सभेचे कार्यवृत्त फेटाळले होते. त्यानंतर विषय सूचितील एक ते आठ विषयांसाठी विशेष ग्रामसभा बोलाविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून परवानगी मागावी, असा ठराव घेतला होता. सभेतील विषय सूचितील एक ते आठ क्रमांच्या विषयांच्या अनुषंगाने कोणतेही ठराव ग्राह्य धरण्यात येऊ नये, असेही नमूद करण्यात आले होते. संरपंचांच्या वतीने या ठरावाला दुजोरा देण्यात आला.

ग्रामसभेत झालेल्या या ठरावानंतरही ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी कारवाईपासून वाचण्यासाठी गावकऱ्यांच्या विरोधात जात या ठरावाला कार्यवृत्तांतावर (प्रोसिडिंगवर ) न घेता जुन्या सभेचे कार्यवृत्त स्वतःच कायम केले. कालांतराने हा प्रकार ग्रामस्थांना कळला. त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) कागदपत्रं गोळा केली. त्यातून हा प्रकार घडकीस आला. या प्रकाराची तक्रार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ग्रामविस्तार अधिकाऱ्यांवर या नियमबाह्य कामासाठी कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केलीय. त्यामुळे नवेगाव बांध येथे ग्रामस्थ विरूद्ध ग्रामविस्तार अधिकारी असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगावबांध ग्रामपंचायत आहे. गावातील लोकसंख्या सुमारे 12 ते 15 हजाराच्या आसपास आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील ही महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. सालेकसा ब्लॉक मध्ये येणाऱ्या नवेगावचे अंतर गोंदिया मुख्यालयापासून सुमारे 65 किलोमीट आहे. ही ग्रामपंचायत सर्वच पक्षांसाठी राजकीय दृष्टीनं महत्त्वाची आहे. सरपंचपदावर मनोज बोपचे हे कार्यरत आहेत. ग्राम विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीमुळे सध्या या ग्रामपंचायतीची चर्चा पंचायत समिती व जिल्हा परिषद पातळीवर जोरात सुरू आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Gram Panchayat Navegaon Bandh in Gondia.
Gondia : विद्यमान खासदारांशी चर्चा केल्यानंतर प्रफुल्ल पटेल ठरविणार लोकसभेची वाटचाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com