Gram Panchayat Set Fire : भ्रष्टाचार पचवण्यासाठी ग्रामसेवकाने ग्रामपंचायतच पेटवली? जुने दस्त खाक...

Hingoli Sakhara Gram sevak : संपूर्ण घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी
Sakhara Gram Panchayat
Sakhara Gram PanchayatSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा गावात ग्रामपंचायत कार्यालयाला आग लावण्याचा प्रकार घडला आहे. या आगीत कार्यालयातील जुने दस्त जळून खाक झाले आहेत, तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर जीवघेणा हल्लाही करण्यात आला आहे. मात्र, या जाळपोळीमागे जखमी ग्रामसेवकाचाच हात असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. परिणामी आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. (Latest Political News)

राजेंद्र बोर्डे असे गंभीर जखमी झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहेत. त्यांच्यावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयातील अनेक जुने दस्तावेज जळून खाक झाले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण घटना ग्रामसेवकाने स्वतःच कट कारस्थान रचून घडवून आणल्याचा गंभीर आरोप गावकरी करत आहेत. भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय जाळून टाकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Maharashtra Political News)

Sakhara Gram Panchayat
Mahadev Mahadik News : आप्पांचं खिडकीतूनच 'मॅनेजमेंट'; 'महाडिक गट अजून मजबूत, काळजी करू नका!'

साखरा गावात ग्रामपंचायतमार्फत वित्त आयोगाच्या निधीमधून विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या भ्रष्टाचारातून नागरिकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. मात्र, प्रशासन ग्रामसेवकाविरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती. (Vidarbh News)

गंभीर आरोप असूनही संबंधित ग्रामसेवकावर कारवाई होत नसल्याने गावात वाद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय जळाल्याची आणि ग्रामसेवकावरील हल्ल्याची संपूर्ण चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी सेनगाव ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Sakhara Gram Panchayat
Raj Thackeray On Mulund : '...तर गालावर वळ उठतील'; मुलुंड घटनेवर राज ठाकरे भडकले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com