Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा ‘गेम’ करण्यासाठी अकोल्यातून ‘फिल्डिंग’

ST Bank: संचालक मंडळावर एसटी कामगार सेनेकडून आरोप
Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteGoogle
Published on
Updated on

Political war in Akola : महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळू नये, यासाठी कडाडून विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते व त्यांना साथ देणाऱ्यांचा कायमचा ‘गेम’ करण्यासाठी अकोला येथून जबरदस्त ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. सदावर्ते व त्यांच्या समर्थकांना कोणत्या मुद्द्यावर कसं व कधी घेरायचं, याची योजनाही आखण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर या खेळाला सुरुवातही झाली आहे..

आरक्षणाला विरोध केल्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर अलीकडेच मोठा हल्ला झाला होता. बुलडाणा येथील एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी, तर सदावर्तेंनांच संपवायला हवं होतं, असं वादग्रस्त विधान केलं. आता अकोल्यातील काहींनी सदावर्ते व त्यांच्या समर्थकांना संपविण्याचा विडा उचलला आहे. संपविणे याचा शब्दश: अर्थ इथं गृहीत न धरता सदावर्तेंचं राजकारण असा आहे. (Gunaratna Sadavarte in another controversy in Akola District after Maratha Reservation issue in Maharashtra)

सदावर्ते पुरस्कृत संचालक मंडळाकडून एसटी बँकेचा कारभार पाहिला जात आहे. या बँकेतील संचालक मनमानी करताहेत, असा आरोप एसटी कामगार सेनेने केला आहे. सदावर्ते यांच्यावरील रोषामुळेच मराठा आंदोलनात एसटी गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचंही एसटी कामगार सेनेनं म्हटलं आहे. एसटी कामगार सेनेनं एसटी बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेत

त्यांना सुरू असलेल्या अनागोंदीची माहिती दिली. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना अॅड. गुणरत्न सदावर्ते त्यात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांचं पॅनेल एसटी बँकेत विजयी झालं. अकोला येथील मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीत बँकेचं कामकाज चालतं. एसटी कर्मचाऱ्यांना वगळून बँकेचे संचालक त्यांच्या संघटनेच्या कामांसाठी ‘ओव्हर ड्राफ्ट’ घेत असल्याचा आरोप एसटी कामगार सेनेचे प्रदेश महासचिव देविदास बोदडे यांनी केला आहे.. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलकडून सध्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली गेल्यानं अनेकांचे हात बांधले गेले आहेत, परंतु आता निवडणुकीतूनच सदावर्तेंना संपवायचं असं काही संघटनांनी ठरवलं असून, त्यासाठी त्यांनी कामगारांची मोट बांधण्यासही प्रारंभ केला आहे. .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सदावर्ते समर्थित पॅनेलने बँक विकासाच्या नावावर विविध पद्धतीनं काम सुरू केलं आहे. कर्ज प्रकरणं प्रलंबित राहणं, कामगारांना ओव्हर ड्राफ्ट न मिळणं अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचा दावा बोदडे यांच्यासह उदय गंगाखेडकर, करुण शिरसाट, चंद्रशेखर चऱ्हाटे, गजानन ठाकरे, भानुदास कडू, गोपाल गावंडे, श्याम दुबे, अनंत कराळे, अल्ताफ शहा, सुनील विखे, आसिफ खतीब, इर्शाद खान, के. आर. राठोड, इरफान शेख, मनोज तायडे, अन्वर मिर्झा, मोहम्मद समीर, चंद्रशेखर पांडे, के. आर. देशमुख, आर. टी. वानखेडे, डी. डी. टाके, डी. एन. भटकर बँक व्यवस्थापकांच्या भेटीदरम्यान केला.

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा येथील रहिवासी आणि एसटीमध्ये चालक असलेले आसिफ खतीब यांच्या भावाचे १३ ऑक्टोबर रोजी अपघाती निधन झालं. भावाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी २५ हजार रुपये मिळावे, यासाठी बँकेत कर्जासाठी अर्ज केला. मात्र, बँकेने कबूल करूनही कर्ज दिलेच नाही, असं या वेळी व्यवस्थापकांना सांगण्यात आलं. बँकेच्या या कार्यपद्धतीमुळं दिवाळीच्या पूर्व संध्येला एसटी कामगार सेना कर्मचाऱ्यांसह ‘डफडे बजाव’ आंदोलनही करणार आहे. एसटी कामगार सेनेचे सर्व आरोप सदावर्ते समर्थित संचालकांनी फेटाळले आहेत. बँक आणि एसटी कामगारांचे हित विरोधकांनी पचत नसल्यानं ते खोडा घालत आहेत. न्यायालयात याचिका दाखल करीत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रारी करीत आहेत, असं बँक संचालक संतोष राठोड यांनी स्पष्ट केलं.

(Edited By : Prasannaa Jakate)

Gunratna Sadavarte
शिंदेंच्या आमदाराचं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य | Sanjay Gaikwad On Gunratna Sadavarte

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com